स्नेहसंमेलनानिमित्त शाळेला दिली भेटवस्तू
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रीय शाळा अडूर नं.१ शाळेतील सन १९९५-९६ च्या इयत्ता सातवीच्या वर्गातील वर्ग मित्र मैत्रिणीं हे तब्बल ३० वर्षानंतर एकत्रित येऊन स्नेहसंमेलन साजरे केले. शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेकजण हे आनंदी क्षण आपल्या कॅमेर्यात टिपत होते. या आनंदयात्री सोहळ्यात सर्वच जण हरखून गेले होते. Reunion at Adur School
मुंबई- पुणे येथे नोकरी व व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आपल्या शाळेची लागलेली ओढ, मित्र भेटीची उत्सुकता सोशल मीडियाद्वारे तब्बल ३० वर्षानंतर पूर्ण झाली. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून या शाळेला दोन कपाटे, सीसीटीव्ही कॅमेरे भेटवस्तू प्रदान केले. Reunion at Adur School
यावेळी माजी केंद्रप्रमुख शुभांगी झगडे, विनायक ओक गुरुजी, दत्तात्रय चिवेलकर गुरुजी, प्रशांत वायंगणकर गुरुजी, सरपंच शैलजा गुरव, उपसरपंच उमेश आरस, विद्यमान शालेय समिती, विद्यार्थी व शिक्षक वृंद आणि सन १९९५-९६ च्या इयत्ता सातवीच्या वर्गातील माजी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांमध्ये रमेश झगडे, सुशील दवंडे, प्रविण माटल, दीपिका झगडे, वैभव जाधव, जयप्रकाश सुर्वे, रुपाली नार्वेकर, वैशाली झगडे, नीलिमा हळये, महेश हळये, शुभांगी मिरगळ, प्रदीप देवळे, दिलीप मांडवकर, हर्षद माटल, अजय धावडे, तृप्ती धावडे, संगीता झगडे, महेश शिगवण इत्यादींचा समावेश होता. Reunion at Adur School