आईच्या पोटात बाळ अन् त्या बाळाच्या पोटातही बाळ
मुंबई, ता. 29 : बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना काल (28 जानेवारी) समोर आली आहे. एका गर्भवती महिलेच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याची अतिशय दुर्मिळ घटना समोर आली. जगाच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात आतापर्यंत 200 तर देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत. Rare event
बुलढाणामधील जिल्हा महिला रुग्णालयात एक 32 वर्षीय गर्भवती महिला आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आली. ही महिला 32 आठवड्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी तपासून तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. स्त्री रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात ही महिला सोनोग्राफीसाठी गेल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर त्यांना धक्काच बसला. सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना समजलं की, महिलेच्या पोटात बाळ आहे आणि त्या बाळाच्या पोटातही एक दुसरे बाळ आहे. डॉक्टरांना विश्वासच बसेना म्हणून त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना बोलवून पुन्हा तपासणी करून निश्चित केलं. Rare event


महिलेची तपासणी केल्यानंतर महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर आल्याने या परिस्थितीला ” फिटस इन फिटो ” असं वैद्यकीय भाषेत म्हटले जाते हे अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आतापर्यंत जगात फक्त 200 तर आपल्या देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलढाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आली आहे. Rare event
नेमकं ही दुर्मिळ घटना काय?
गर्भवती महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटातही एक बाळासारखाच गोळा दिसतो याला “फिटस इन फेटो” असं म्हटले जातं. “काँनजेनाईटल एबनॉर्मलिटी” मुळे ही अशी परिस्थिती उद्भवते. जवळपास 5 लाख सामान्य गरोदर महिलांमध्ये एक, तर 20 लाख गरोदर महीलांमध्ये एखाद्या महिलेत अशी परिस्थिती दिसून येते. अशा वेळेस प्रसूतीनंतर ज्यावेळी बाळाला बाळाच्या पोटातील बाळाचा त्रास होतो. त्यावेळी शस्त्रक्रिया करून त्या बाळाच्या पोटातील बाळ काढून घेतल्या जातं. Rare event