रत्नागिरी, ता. 19 : केंद्र शासन स्तरावरून स्वच्छता ग्रीन लिफ रेटिंग इन हॉस्पीटॅलिटी फॅसिलिटीबाबत अमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. यानुसार जिल्हास्तरीय समिती व पडताळणी उपसमिती स्थापन करण्यात आली असून त्यावर रत्नागिरी पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुहास तथा राजू विलास भाटलेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असून
त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी आदींसह उच्च पदस्थांचा समावेश आहे. Raju Bhatlekar on Hospitality Committee
गेली अनेक वर्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करत असणारे राजू भाटलेकर यांची विशेष निवड झाली आहे. त्यामुळे सर्व पर्यटक व्यवसाय अभिनंदन करत आहेत. या समितीमध्ये उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, मुख्याधिकारी तुषार बाबर, सदस्य सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राहुल देसाई, जिल्हा पर्यटन विभाग प्रतिनिधी दीपक माने हेसुद्धा या समितीमध्ये आहेत. Raju Bhatlekar on Hospitality Committee
जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने राजू भाटलेकर यांची निवड केल्याचे पत्र दिले आहे. स्वच्छ भारत मिशनचा टप्पा क्र. २ हा केंद्र शासनाचा राष्ट्रीय प्रमुख कार्यक्रम आहे. जो ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी राबवण्यात येत आहे. यामध्ये वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय बांधकाम व वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, ग्रे वॉटर, मैला गाळ व्यवस्थापन अशी कामे करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात रिसॉर्ट, हॉटेल, होम स्टे व धर्मशाळा यासारख्या अनेक राहण्याच्या आदरातिथ्य सुविधा रत्नागिरी जिल्ह्यात उपलब्ध आहेत. या सुविधांमधून स्वच्छता राखण्याबाबत काटेकोर कार्यवाही होत असते. परंतु सर्वच ठिकाणी स्वच्छतेबाबत लोक जागरूक असतील असे होत नसल्याने ज्या ठिकाणी आदरातिथ्य राहण्याच्या सुविधा आहेत, अशा चालकांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये ओडीएफ (ओपन डिफेक्शन फ्री) दर्जा प्राप्त करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतींना पाठिंबा देणे महत्वाचे आहे. यासाठी आदरातिथ्य पुरवणाऱ्या चालकांनी पुरेशा पायाभूत सुविधांचा विकास करणे, चांगल्या पद्धतींचा अवलंब करणे, जबाबदार पर्यटनाचा एक भाग म्हणून स्वच्छता आणि स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी मदत अपेक्षित असल्याने केंद्र शासनाने पर्यटन क्षेत्रात स्वच्छता शाश्वत टिकवून राहण्यासाठी स्वच्छता ग्रीन लिफ रेटिंग अभियान सुरू केले आहे. Raju Bhatlekar on Hospitality Committee
आदरातिथ्य सुविधा पुरवणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी या सर्वामध्ये स्वेच्छेने सहभागी होणे गरजेचे आहे. सुविधा क्षेत्रामध्ये चांगल्या स्वच्छतेच्या सवयी, जनजागृतीसह पायाभूत सुविधांमधील शिल्लक असलेली तफावत भरून काढण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. कार्यक्रम पर्यटन क्षेत्रासाठी मिशन लाईफ अंतर्गत शाश्वत पर्यटन बाबत प्रचार, प्रसिद्धी करण्यासाठी, पर्यटक व पर्यटन व्यवसायांना स्वच्छतेच्या सवयी व पद्धती अवलंबून निसर्गाशी समतोल राखण्याबाबत सुरू करण्यात आली आहे. Raju Bhatlekar on Hospitality Committee