गुहागर, ता. 26 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात नुकतीच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती मुख्याध्यापक व्ही.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. यावेळी बहुसंख्य विद्यार्थिंनी व विद्यार्थी यांनी भाषणातून मनोगत व्यक्त केले. Rajmata Jijau Jayanti in Patpanhale School
यावेळी उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद व विद्यार्थी यांचे शाब्दिक स्वागत करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांनी भूषविले. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील व ज्येष्ठ शिक्षिका एस.एस.चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवर म्हणून जेष्ठ शिक्षिका व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण, वक्ते व शिक्षिका सौ.सावंत – विचारे, सौ. एन.पी.वैद्य, सौ.सृष्टी चव्हाण, एस.बी.मेटकरी, एस.वाय.भिडे, एस.एम.आंबेकर उपस्थित होते. Rajmata Jijau Jayanti in Patpanhale School


विद्यालयामधील बहुसंख्य विद्यार्थींनी व विद्यार्थी यांनी स्वामी विवेकानंदांचे कार्य व राजमाता जिजाऊ यांची शिकवण याबाबत मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व शिक्षिका सौ.सावंत – विचारे यांनी स्वामी विवेकानंदांचे धाडसी कार्य, स्वामी विवेकानंदांनी दिलेली शिकवण, राजमाता जिजाऊंचे कार्य व शिकवण, राजमाता जिजाऊंचा आदर्श आदी मुद्यांनुसार मार्गदर्शन केले. कार्यक्रमाध्यक्ष व मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तरुणांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊंची शिकवण, जिजाऊंनी दिलेली प्रेरणा आदि मुद्द्यांनुसार अध्यक्षीय भाषण व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी व शिक्षक एस.एम. आंबेकर यांनी केले. शिक्षिका सृष्टी चव्हाण यांनी उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद व बहुसंख्य विद्यार्थी यांच्या सहकार्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. Rajmata Jijau Jayanti in Patpanhale School