संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 26 : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका गुहागर (मुंबई व ग्रामीण) आणि गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आबलोली, शाखा शृंगारतळी, शाखा हेदवी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ व २८ जानेवारी रोजी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. Haldi Kunku ceremony by Kunbi Samojannati Sangh
गुहागर बाजाराच्या (शृंगारतळी व तळवली शाखा) महिला सभासद, महिला ग्राहक आणि हितचिंतक महिलांसाठी शनिवार दि. २७ जानेवारी २०२४ रोजी आबलोली येथील पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात तवसाळ गटातील महिलांसाठी सकाळी ११ ते २ या वेळेत आणि हेदवी गटातील महिलांसाठी दुपारी ३ ते ५ या वेळेत हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी गुहागर बाजार शृंगारतळी येथे जिल्हा परिषद पालशेत गटातील महिलांसाठी सकाळी ११ ते २ या वेळेत आणि गुहागर गटातील महिलांसाठी दुपारी ३ ते ५ या वेळेत हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. Haldi Kunku ceremony by Kunbi Samojannati Sangh
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/01/adv-1.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/01/adv-1.jpg)
तरी महिला सभासद, ग्राहक महिला आणि हितचिंतक महिलां भगीनींनी हळदी कुंकू समारंभाचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन कुणबी समाजोन्नती संघ तालुका गुहागर मुंबई व ग्रामिण अध्यक्ष, सरचिटणीस व सर्व पदाधिकारी आणि कुणबी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आबलोली, शाखा शृंगारतळी, शाखा हेदवी यांचे चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक तसेच गुहागर गट, पालशेत गट, हेदवी गट तवसाळ गट, मध्यवर्ती युवक मंडळ युवक मंडळ यांचे अध्यक्ष सरचिटणीस सर्व पदाधिकारी आणि महिला मंडळ यांनी केले आहे. Haldi Kunku ceremony by Kunbi Samojannati Sangh