• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती

by Ganesh Dhanawade
January 26, 2024
in Guhagar
59 0
0
Rajmata Jijau Jayanti in Patpanhale School
116
SHARES
330
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात नुकतीच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती मुख्याध्यापक व्ही.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. यावेळी बहुसंख्य विद्यार्थिंनी व विद्यार्थी यांनी भाषणातून मनोगत व्यक्त केले. Rajmata Jijau Jayanti in Patpanhale School

यावेळी उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद व विद्यार्थी यांचे शाब्दिक स्वागत करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांनी भूषविले. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील व ज्येष्ठ शिक्षिका एस.एस.चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.  यावेळी मान्यवर म्हणून जेष्ठ शिक्षिका व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण, वक्ते व शिक्षिका सौ.सावंत – विचारे, सौ. एन.पी.वैद्य, सौ.सृष्टी चव्हाण, एस.बी.मेटकरी, एस.वाय.भिडे, एस.एम.आंबेकर उपस्थित होते. Rajmata Jijau Jayanti in Patpanhale School

विद्यालयामधील बहुसंख्य विद्यार्थींनी व विद्यार्थी यांनी स्वामी विवेकानंदांचे कार्य व राजमाता जिजाऊ यांची शिकवण याबाबत मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व शिक्षिका सौ.सावंत – विचारे यांनी स्वामी विवेकानंदांचे धाडसी कार्य, स्वामी विवेकानंदांनी दिलेली शिकवण, राजमाता जिजाऊंचे कार्य व शिकवण, राजमाता जिजाऊंचा आदर्श आदी मुद्यांनुसार मार्गदर्शन केले. कार्यक्रमाध्यक्ष व मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तरुणांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊंची शिकवण, जिजाऊंनी दिलेली प्रेरणा आदि मुद्द्यांनुसार अध्यक्षीय भाषण व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी व शिक्षक एस.एम. आंबेकर यांनी केले. शिक्षिका सृष्टी चव्हाण यांनी उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद व बहुसंख्य विद्यार्थी यांच्या सहकार्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. Rajmata Jijau Jayanti in Patpanhale School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRajmata Jijau Jayanti in Patpanhale SchoolUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share46SendTweet29
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.