गुणवत्तेनुसार दर, पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा
गुहागर, ता. 02 : गुढीपाडव्याच्या मुर्हूतावर गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीने काजू खरेदीला सुरवात केली. पहिल्याच दिवशी 1 टन काजू खरेदी करण्यात आला. शेतकऱ्यांना काजु बीच्या गुणवत्तेनुसार दर देण्यात येत असून ठरलेली रक्कम कंपनीद्वारे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. अशी माहिती कंपनीचे मुख्याधिकारी मंदार जोशी यांनी दिली. Purchase of cashew seeds from an organic producer


गुहागर सेंद्रिय उत्पादन Aकंपनीमार्फत नव्या हंगामातील काजू खरेदीला सुरूवात झाली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कंपनीने 1 टन काजू खरेदी केला. काजू बागायदारांना काजू बी च्या गुणवत्तेनुसार 100 ते 150 रु. प्रति किलो असा दर देण्यात आला. गेल्या दोन दिवसांत एकूण 2 टन काजूची खरेदी झाली आहे. Purchase of cashew seeds from an organic producer


कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोशी म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांकडून सरसकट बी खरेदी करत नाही. गुणवत्तेप्रमाणे दर निश्चित होत असल्याने त्याचा फायदा थेट बागायदारांना मिळत आहे. कंपनीमार्फत जीएसटी पावती मिळत असल्याने शासनाकडून मिळणाऱ्या काजू बी अनुदानासाठी बागायदाराला फायदा होतो. आमच्याशी जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांना काजू बी उत्पन्नवाढीसाठी आम्ही प्रशिक्षणाची मोफत व्यवस्था करतो. काजू खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँकेत जमा होते. त्यामुळे दलाली, कमिशन देण्याचा प्रश्र्न उद्भवत नाही. शिवाय किसान क्रेडिट कार्ड (शेती कर्ज) साठी हा व्यवहाराचा फायदा होतो. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कंपनीला काजू देऊन सहकार्य करावे. तसेच कंपनीचे सभासद नाही अशा शेतकऱ्यांनी सभासद व्हावे. असे आवाहन मंदार जोशी यांनी केले. Purchase of cashew seeds from an organic producer


गावोगावी येणारे फिरुस्ते काजू बीया खरेदी करतात त्यातून शेतकऱ्याला योग्य दर मिळत नाही. याउलट गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीत चांगल्या दरात काजू बी विकता येते. शिवाय जुनपासून मार्चपर्यंत या कंपनीमार्फत काजू उत्पादनवाढीसाठी मोफत योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळते. त्यामुळे सर्व काजू उत्पादकांनी या कंपनीतच काजू बी द्यावी. असे आवाहन मी करतो. – संजय गमरे, काजू बागायतदार Purchase of cashew seeds from an organic producer
काजू खरेदीसाठी तसेच कंपनीच्या अधिक माहितीसाठी भेटा किंवा संपर्क करा :
गुहागर तालुका सेंद्रीय उत्पादक कंपनी,
शृंगारतळी पोस्ट ऑफीसजवळ, गाळा नं. ३,
मु. पो. शृंगारतळी, ता. गुहागर,
कार्यालय संपर्क :- 8999275465
कंपनीचे अध्यक्ष :- अनंत जोयशी 7796560050,
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी – मंदार जोशी 9527317982
विश्वास भिडे – 8380962658, अक्षय माने – 9730122605