जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, ता. 30 : सर्व विभागांनी अंमली पदार्थांच्या उच्चाटनासाठी सतर्क रहावे. शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभागाने शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षक, पालक यांची बैठक घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी कार्यक्रम घ्यावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली. Public awareness against drugs
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात एनकॉर्डची बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्यासह प्रांताधिकारी तहसिलदार उपस्थित होते. Public awareness against drugs
पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी विषयवाचन करुन मागील बैठकीचा वृत्तांत सांगितला. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, तडीपारची प्रकरणे ज्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत, त्यांनी ती मार्गी लावावीत. जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ कुठून येतात त्याबाबत सतर्क राहून, त्याची माहिती द्यावी. Public awareness against drugs