तेली ज्ञाती बांधव अडूर यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजन
गुहागर, ता. 29 : तेली समाजाचे आराध्य दैवत व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते राष्ट्रसंत श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या पुण्यतिथी वर्षपूर्ती निमित्त श्री. विठ्ठलाईदेवी मंदिर, अडूर येथे गुहागर तालुका तेली समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Game of Paithni at Adur
दि. ०१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा तसेच समाजातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तेली ज्ञाती बांधव अडूर यांच्या वार्षिक कार्यक्रमाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम नियोजित वेळेत चालू करण्यात येणार असल्याने सर्व समाज बांधवांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन गुहागर तालुका तेली समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. Game of Paithni at Adur