गुहागर, ता. 16 : श्री स्वामी दत्त फाउंडेशन, पुणे अंतर्गत श्री स्वामी दत्त अध्यात्मिक उन्नती केंद्र, मुंबई विभाग तसेच वन विभाग, डहाणू आणि नॅशनल हाई स्पिड रेल्वे कॉर्पोरेशन(बुलेट ट्रेन) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त कप्पा क्रमांक ५१, वनक्षेत्र नवासखरा, मौजे नवा साखरा, तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे १३०० विविध जातीचे वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केलेली आहे. Plantation of trees on Independence Day


ह्या वृक्षांची पुढील १० वर्षे देखभाल व निगा राखण्यासाठी वन विभाग, डहाणू यांचे सहकार्य लाभले आहे. सदर वनक्षेत्रात करंज, सावर, बेहडा, बाहवा या प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे. गुरुवर्य श्री श्री १००८ महामंडलेश्वर अण्णा योगीजी यांच्या संकल्पनेतून निसर्ग करिता आपले दायित्व पूर्ण करणे करिता वृक्षवल्ली योजने अंतर्गत ५ वर्षात १,००, ००० वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आहे, अशी माहिती या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकर अण्णा लोकरे यांनी दिली. Plantation of trees on Independence Day

