डॉ .अनिकेत गोळे, वसुंधरा जपणे हे महान कार्य
गुहागर, ता. 11 : या सृष्टीतील पर्यावरण जंगल, डोंगर, नद्या, वायू, जमीन आणि समुद्र यांमुळे चांगले राहते. या घटकांची पर्यावरण संवर्धनात प्रमुख भूमिका असते. आज-काल अनेक कारणाने पर्यावरणाला धक्का पोहोचत आहे. यासाठी वसुंधरा जपणे हे महान कार्य या कार्याला सर्वांनी हातभार लावावा, असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी चे अध्यक्ष डॉ .अनिकेत गोळे केले. Plantation by Lions Club


आज ११ ऑगस्ट लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. डिव्हिजन मधील 90 लायन्स क्लबने एकाच वेळी वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमाचे नियोजन केले होते. लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी ने ५ ०० झाडे लावण्याचा निर्धार केला आहे .गुहागर पोलीस परेड ग्राउंड च्या मागे सुरू बंन येथे प्रार्थमिक स्वरूपात सुरुची १०० झाड लावून वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमाचा शुभारंभ गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. Plantation by Lions Club


वृक्षारोपण साठी डॉक्टर असोसिएशनचे डॉ. मंदार आठवले, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, तालुका कृषी अधिकारी शिरसागर, नगरपंचायतचे जनार्दन साटले, गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, क्लब ऑफ गुहागर सिटी चे मनीष खरे, माधव ओक, संतोष वरंडे, सचिन मुसळे, श्यामकात खातु, डॉ. मयुरेश बेंडल, शैलेंद्र खातू , डॉ. काळे, प्रसाद वैद्य, नरेश पवार, डॉ. मयुरेश बेंडल, नितीन बेंडल आदी उपस्थित होते. एनसीसी विद्यार्थी, जीवनश्री प्रतिष्ठान, गुहागर पत्रकार संघ, सामाजिक वनीकरण, मेरिटाइम बोर्ड, मेडिकल असोसिएशन, गुहागर व्यापारी संघ, हॉटेल असोसिएशन आणि नगरपंचायत कार्यालय गुहागर सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वरांडे यांनी केले. Plantation by Lions Club