गुहागर, ता. 20 : तालुक्यातील वरवेली शिंदेवाडी फाटा येथील श्री हसलाईदेवी मंदीर शेजारील पिकअप शेड अत्यंत धोकादायक स्थितीत असून सदरची पिकअप शेड त्वरित तोडण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. Pick up shed at Varveli dangerous


प्रवाशांना उन्हाळा-पावसाळ्यात बसण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी पीकअप शेड बांधण्यात आली होती. परंतु सदरचे पिकअप शेड धोकादायक असल्याने या पिकअप शेड मध्ये प्रवासी बसू शकत नाही. सदरचे पिकअप शेड तत्कालीन आमदार डॉ. विनय नातू यांच्या स्थानिक आमदार निधीतून सन २००४/०५ मध्ये बांधण्यात आली होती. परंतु सध्या ही शेड केव्हाही कोसळून भीषण अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सदर शेडमध्ये कुणीही बसू नये, अपघात होण्याची शक्यता आहे अशा मजकुराचा वरवेली ग्रामपंचायतवतीने कागद चिकटविण्यात आला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरची शेड त्वरित तोडावी. तसेच या ठिकाणी नवीन शेड बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. Pick up shed at Varveli dangerous