गुहागर, ता.19 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी व माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सैनिक गणपत चव्हाण, सुनील जाधव व श्री. शेख, माजी पोलीस पाटील सत्यप्रकाश चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. Patpanhale School honors ex-servicemen
पाटपन्हाळे विद्यालयात पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजगीत, राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रतिज्ञा, देशभक्ती गीत सादरीकरण करण्यात आले. यावेळी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण, संचालक अनंत चव्हाण, महेश कोळवणकर, पाटपन्हाळे ग्रा.पं सरपंच विजय तेलगडे, माजी सैनिक गणपत चव्हाण, श्री. शेख, सुनिल जाधव, प्रा. देसाई, पोलीस पाटील विशाल बेलवलकर , गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागरचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी संतोष जोयशी, भूषण ओक, श्री. हातिस्कर, श्रीम. आगरे, मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील, श्रीम. सौंदेकर, पर्यवेक्षक जी. डी. नेरले आदी उपस्थित होते. Patpanhale School honors ex-servicemen


उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मधील पाटपन्हाळे कनिष्ठ महाविद्यालयातील कला विभागातील सोलकर सिद्धी रमेश – प्रथम क्रमांक, सोलकर रिद्धी रमेश – द्वितीय क्रमांक , जाधव श्रावणी प्रशांत – तृतीय क्रमांक, वाणिज्य शाखेतील विचारे जान्हवी प्रफुल्ल – प्रथम क्रमांक, सकपाळ शिवम सुधाकर व गमरे भूमिका प्रशांत – द्वितीय क्रमांक, पवार साक्षी विजय – तृतीय क्रमांक तसेच शास्त्र शाखेमधील बैकर रिया रघुनाथ – प्रथम क्रमांक, गमरे श्रावणी सुजित – द्वितीय क्रमांक, सकपाळ सोनाली संजय – तृतीय क्रमांक यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, शालेयपयोगी भेटवस्तू व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आले. Patpanhale School honors ex-servicemen
माध्यमिक शालांत परीक्षेमधील गुरव वेदांत महेंद्र – प्रथम क्रमांक, विचारे रिया प्रकाश – द्वितीय क्रमांक, गावडे तन्वी संतोष – तृतीय क्रमांक, इंग्रजी माध्यम पाटपन्हाळे विद्यालयातील इयत्ता दहावीचे यशवंत विद्यार्थी कदम स्वराली विश्वनाथ – प्रथम क्रमांक, जैतपाल सिया मुनीष – द्वितीय क्रमांक , मोरे आर्या गणेश – तृतीय क्रमांक, नवोदय परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थी व इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक पवार कुशल वैभवकुमार , इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक पाष्टे सिद्धार्थ अशोक, इयत्ता आठवी शिष्यवृत्तीधारक समृद्धी सुरेश आंबेकर , इयत्ता आठवी शिष्यवृत्तीधारक व एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक मृण्मयी दत्ताराम जाधव या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, शालेय भेटवस्तू व रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. Patpanhale School honors ex-servicemen