गुहागर, ता. 22 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली भारताचे माजी पंतप्रधान कै. राजीव गांधी यांची जयंती “सदभावना दिवस” म्हणून साजरा करण्यात आला. Patpanhale College Celebrates Goodwill Day


कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते कै. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी सदभावना दिवसाचे महत्व सांगितले. प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी आपल्या मनोगतातून कै. राजीव गांधी यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन ते आचरणात आणावे म्हणजे खऱ्या अर्थाने कै. राजीव गांधी यांचे स्मरण केले असे म्हणता येईल असे म्हटले. यावेळी द्वितीय वर्ष कला वर्गातील साहिल आग्रे याने उपस्थित विद्यार्थी व मान्यवर यांना सदभावना दिवसाची शपथ दिली. Patpanhale College Celebrates Goodwill Day


सदर कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, प्रा. कांचन कदम, डॉ. प्रसाद भागवत, ग्रंथपाल श्री. धनंजय गुरव, श्री. परशुराम चव्हाण व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवर यांचे आभार डॉ. प्रवीण सनये यांनी मानले. Patpanhale College Celebrates Goodwill Day

