• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महावि‌द्यालयात सदभावना दिवस साजरा

by Manoj Bavdhankar
August 22, 2024
in Guhagar
102 1
0
Patpanhale College Celebrates Goodwill Day
201
SHARES
573
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली भारताचे माजी पंतप्रधान कै. राजीव गांधी यांची जयंती “सदभावना दिवस” म्हणून साजरा करण्यात आला. Patpanhale College Celebrates Goodwill Day

Patpanhale College Celebrates Goodwill Day

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते  कै. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी सदभावना दिवसाचे महत्व सांगितले. प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी आपल्या मनोगतातून कै. राजीव गांधी यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन ते आचरणात आणावे म्हणजे खऱ्या अर्थाने कै. राजीव गांधी यांचे स्मरण केले असे म्हणता येईल असे म्हटले. यावेळी ‌द्वितीय वर्ष कला वर्गातील साहिल आग्रे याने उपस्थित वि‌द्यार्थी व मान्यवर यांना सदभावना दिवसाची शपथ दिली. Patpanhale College Celebrates Goodwill Day

Patpanhale College Celebrates Goodwill Day

सदर कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, प्रा. कांचन कदम, डॉ. प्रसाद भागवत, ग्रंथपाल श्री. धनंजय गुरव, श्री. परशुराम चव्हाण व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवर यांचे आभार डॉ. प्रवीण सनये यांनी मानले. Patpanhale College Celebrates Goodwill Day

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPatpanhale College Celebrates Goodwill DayUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share80SendTweet50
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.