पराग कांबळे यांचा गंभीर इशारा
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 31 : जागतिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गुहागर शहरातील प्रवेशद्वाराचा प्रमुख रस्ता गुहागर शहर ते शासकीय विश्रामगृह नजीकचे तिसरे वाकण पर्यंतचा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. मृत्यूचा सापळा बनला आहे. वाहनधारक यांना या मार्गांवर वाहने कशी चालववीत हा यक्ष प्रश्न पडत आहे. येत्या काही दिवसात या रस्याबाबत संबंधित ठेकेदार व सरकारी अधिकारी यांनी योग्य निर्णय घेतला नाही तर उग्र स्वरूपाटील आंदोलनाचा विचार करावा लागेल असा सज्जड इशारा बळीराज सेना जिल्हा अध्यक्ष तसेच प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष आणि जेष्ठ पत्रकार पराग कांबळे यांनी दिला आहे. Parag Kamble’s warning of agitation


गुहागर शहर हे पर्यटन केंद्र आहे. या ठिकाणी मुख्य रस्त्याची अवस्था बघितली तर याठिकाणी लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी आहेत की, नाही असा प्रश्न पडत आहे. गुहागर विजापूर मार्गांवरील जे काही प्रश्न असतील ते आम्हांला माहित नाहीत पण ठेकेदार व त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सरकारी अधिकारी यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. अन्यथ: आंदोलन छेडावे लागेल, असा गंभीर इशारा बळीराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष तसेच प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आणि जेष्ठ पत्रकार पराग कांबळे यांनी दिला आहे. Parag Kamble’s warning of agitation