पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत
गुहागर, ता. 10 : रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयाने नेहमीच स्पर्धा परीक्षेमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सन 2023- 24 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता आठवीचे 19 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते यापैकी सात विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. इयत्ता पाचवीपासूनच या सर्व विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. Palshet High School Success in Scholarship Exam


यामध्ये कुमारी आर्या विलास ओक J68/133, कुमारी स्वरा निलेश पावरी J93/133, कुमारी वैष्णवी श्रीधर पावरी J110/133, तेजल सुभाष जाधव A1/6 आणि कु. अन्विता अनिलकुमार सावर्डे A6/6 हे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत तसेच प्राथमिक शिष्यवृत्ती मध्ये विद्यालयाचा हर्ष शैलेश सैतवडेकर J16/162 गुणवत्ताधारक ठरला आहे. यांना प्रत्येकी 15000 हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विभाग प्रमुख श्री. ढेंबरे सर (8वी), श्री . शिंदे सर, लांबोर सर ,सौ.कुंभार मॅडम, तसेच श्री.क्षीरसागर सर (5 वी विभागप्रमुख)श्री . बर्डे सर, हिवराळे सर, सावंत सर यांचेही अभिनंदन होत आहे. प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री.जोगळेकर सर पर्यवेक्षिका सौ. ढेरे मॅडम यांनीही यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. Palshet High School Success in Scholarship Exam