इस्लामिक देशातही महाकुंभाबाबत उत्सूकता
गुहागर, ता. 11 : आज महाकुंभाच्या बातम्या जगभरात मोठ्या प्रमाणावर इंटरनेटवर शोधल्या जात आहेत. महाकुंभ म्हणजे केवळ हिंदूंचा धार्मिक मेळा न राहता, ती एक जागतिक घटना बनली आहे. ब्राझील, जर्मनी, जपान, इंग्लंड, अमेरिका, स्पेन यांसारख्या तमाम देशांतुन भाविक आले आहेत. महाकुंभात आलेल्यांची संख्या ४० कोटी पार झाली आहे. आश्चर्याची बाब अशी की पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि कतार या इस्लामिक देशांत ‘महाकुंभ’ हा इंटरनेटवर सर्वाधिक शोधला गेलेला शब्द आहे. Pakistani Hindus in India for Mahakumbh
पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कराची येथील किमान १,५०० वर्षे जुन्या पंचमुखी हनुमान मंदिराचे पुजारी महंत रामनाथ महाराज अस्थी विसर्जनासाठी आणि महाकुंभात स्नानासाठी इतर ६९ पाकिस्तानी हिंदू बांधवांसोबत आले होते. या स्वयंभू पंचमुखी हनुमंताचे मंदिर पाकिस्तानातील हिंदूंसाठी अतिशय महत्वाचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराला इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. जिथे हे मंदिर आहे, तो सगळा परिसर पाकिस्तानातील ‘मिनी इंडिया’ या नावाने ओळखला जातो. कारण तिथे प्रामुख्याने सिंधी हिंदू समाजाची लोकसंख्या आहे. Pakistani Hindus in India for Mahakumbh


गेल्या आठ वर्षांपासून कराची, पाकमधील हैदराबाद आणि सिंध प्रांतातील आसपासच्या क्षेत्रात मृत्यू पावलेल्या ४८० हिंदू माता भगिनी आणि बंधूंच्या अस्थी त्यांनी कराचीच्या आपल्या पंचमुखी हनुमान मंदिरात जपून ठेवल्या होत्या. यापूर्वी पाकिस्तानातून २०११ मध्ये १३५ आणि २०१६ मध्ये १६० अस्थिकलश हरिद्वारला आणून विसर्जित करण्यात आले होते. पूर्वीच्या नियमानुसार, ज्यांचे नातेवाईक भारतात राहतात, केवळ अशा कुटुंबांनाच अस्थी विसर्जनासाठी व्हिसा मिळत असे. त्यामुळे गंगेत आपल्या परिवारजनांच्या अस्थी विसर्जनासाठी भोगाव्या लागणाऱ्या यातना आणि लाचारी पाकिस्तानातील दुर्दैवी हिंदू कुटुंबांच्या नशिबी आली होती. Pakistani Hindus in India for Mahakumbh
मात्र आता पाकिस्तानातील हिंदूंसाठी मोदी सरकारने हा नियम बदलला आहे. आता तुमचे नातेवाईक भारतात असोत वा नसोत, अस्थी विसर्जनासाठी पाकिस्तानातील हिंदू परिवारांना मोदी सरकारकडून सरसकट व्हिसा दिला जाऊ लागला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील सकल हिंदू समाज सुखावला आहे. त्यामुळे हे अस्थिविसर्जन अत्यंत महत्वाचे ठरले आहे. Pakistani Hindus in India for Mahakumbh