पाटपन्हाळे विद्यालयातील आर्या जानवळकर व समृद्धी आंबेकर प्रथम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील पाटपन्हाळे विद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र राज्यतर्फे निसर्गाबाबत जनजागृती होणे व वृक्ष संवर्धन करणे या उद्देशाने दोन गटात चित्रकला स्पर्धा नुकतीच संपन्न झाली होती. या चित्रकला स्पर्धेसाठी वृक्षारोपण , वृक्षसंवर्धन व वृक्षतोडीला विरोध करणारी मुले असे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गट क्रमांक १ – इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये आर्या अनंत जानवळकर व गट क्रमांक २ – इयत्ता नववी ते दहावीमध्ये कु. समृद्धी सुरेश आंबेकर यांनी प्रथम क्रमांक संपादन केला. यशस्वी विद्यार्थ्यांना सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी श्री.दबडे, श्री.माळी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकवृंद यांच्या हस्ते आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. Painting Competition by Forestry Department


चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम आर्या अनंत जानवळकर, द्वितीय ओजस्वी सुधीर वासनिक व तृतीय क्रमांक नेहा संदीप निवाते यांनी पटकावला. गट क्रमांक २ मध्ये प्रथम समृद्धी सुरेश आंबेकर, द्वितीय श्रीया संतोष नागेश, तृतीय क्रमांक मैथिली विनोद कदम यांनी संपादन केला. सदरच्या स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयामधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. चित्रकला स्पर्धेतील यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक एस.बी.मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी व सहभागी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ , सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी श्री.दबडे, श्री.माळी, मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील, पर्यवेक्षक जी.डी.नेरले, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. Painting Competition by Forestry Department