• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बोअरवेल, विहीरींमध्ये पाण्याचा खडखडाट

by Ganesh Dhanawade
May 1, 2024
in Guhagar
145 2
0
Overview of water scarcity

गुहागर : पाणी टंचाईबाबतची पहाणी करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव

286
SHARES
816
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

परिक्षित यादव यांनी घेतला पाणी टंचाईचा आढावा

गुहागर, ता. 01 :  तालुक्यातील 60 बोअरवेल आणि विहीरींमध्ये पाण्याचा खडखडाट आहे. केवळ मोडकाआगर धरणच गुहागर तालुक्याची तहान भागवू शकते. असा अहवाल पाणी पुरवठा विभागाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांच्यासमोर सादर केला. त्यावेळी पाणी टंचाई आहे म्हणून टँकरने पाणी पुरवठा करणे. हा पर्याय होऊ शकत नाही. समस्याग्रस्त गावात जलस्त्रोत वाढवीण्यासाठी उपाययोजना करा. अशा सूचना यादव यांनी केल्या. Overview of water scarcity

रत्नागिरीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी गुहागर पंचायत समितीमध्ये 9 गावातील पाणी टंचाईचा आढावा घेतला. कायमस्वरुपी उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. तसेच टंचाईमुक्त गावांची, जलजीवनच्या कामांची पहाणी केली.  या आढावा बैठकीच्या सुरुवातीला ग्रामिण पाणी पुरवठा उपअभियंता मंदार छत्रे यांनी तालुक्यातील पाणी टंचाईचा अहवाल सादर केला.  सध्या सडेजांभारी, शिवणे व धोपावे येथील गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. रानवी गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी कोरड्या पडल्या आहेत. 60 बोअरवेलमध्ये पाण्याचा खडखडाट आहे. आजच्या स्थितीला या गावांची तहान मोडकाआगर येथील धरण या गावाची तहान भागवू शकते. Overview of water scarcity

 यावेळी बोलताना यादव म्हणाले की, धरणातील पाणी टँकरने पुरविणे हा कायमस्वरुपी उपाय होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक गावाला मोडकाआगर धरणातून देण्याचा पर्याय निवडताना त्याचा खर्च जनतेवरच पडणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. हा खर्च कमी करण्यासाठी सौर उर्जेवर आधारीत पंपहाऊस उभे करावे लागतील. याबाबतचा अहवाल पाठवावा. मात्र कायमस्वरुपी उपाय योजनांमध्ये भुजल पातळी वाढविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रयोग करावेत. अशा सूचना त्यांनी केल्या. Overview of water scarcity

या दौऱ्यामध्ये परिक्षित यादव यांनी मोडकाघर येथील धोपावे गावासाठीची खोदण्यात आलेल्या नळपाणी योजनेच्या विहीरीची पहाणी केली. सदर योजना पुर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडे चर्चा करू असे त्यांनी सांगितले. पाटपन्हाळे गावाच्या जलजीवन मिशन अंतर्गतच्या नळपाणी पुरवठा योजनेमधील पाटपन्हाळे कोंडवाडी येथील पाणी साठवण टाकी, विहीर यांची पहाणी केली. वरवेली येथील १ मेगावॅटचा सौरउर्जा प्रकल्पाकरीताच्या जागेची पहाणी केली. त्रिशुलसाखरी गवळवाडी येथे भेट देऊन पाणी साठयाची पहाणी केली. येथील वाडी जलजीवनमध्ये घेण्यासाठी ग्रामस्थांकरीता बैठक घेण्याची सूचना यावेळी केली.  खामशेत गावाने महाराष्ट्र राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधुन सर्वाधिक काम केले आहे. तेथील गांडूळखत प्रकल्प व नॅडेप सर्वाधिक आहेत. त्याची पहाणी केल्यानंतर या गावात सेंद्रियशेती करण्याचे नियोजन करण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली. Overview of water scarcity

या संपूर्ण दौऱ्यात गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, ग्रामिण पाणी पुरवठा उपअभियंता मंदार छत्रे, कृषी विस्तार अधिकारी सर्जेराव कांबळे, गजेंद्र पौनीकर, जिल्हा परिषद बांधकामचे शाखा अभियंता रमेश ढगे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. जांगीड आदी उपस्थित होते. Overview of water scarcity

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarOverview of water scarcityUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share114SendTweet72
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.