मनसे उत्तर जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांचे मनसैनिकांनी आवाहन
गुहागर, ता. 01 : मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी मोदी साहेबांना बिनशर्थ पाठिंबा दिला आहे. जर गुहागर विधानसभा मतदारसंघ मनसेकडे खेचून आणायचा असेल तर महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठीसाठी मनसैनिकांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन मनसेचे उत्तर जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी केले. MNS campaigning for party building
शृंगारतळी येथील हॉटेल हेमंत येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, मनसे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, जिल्हा सचिव संतोष नलावडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष पुष्पेन दिवटे, उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, गुहागर शहर अध्यक्ष नवनाथ साखरकर, चिपळूण तालुका अध्यक्ष शशीकांत डोळस, माथाडी कामगार राज्य सरचिटणीस रवींद्र काणेकर, उप तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, सचिन गडदे, सुहास चोगले , प्रसाद विखारे, सुरेश घाग, सुरेश चांदीवडे, स्वप्निल कांबळे, विवेक मोरे यांच्यासह तालुक्यातील सर्व मनसे सैनिक उपस्थित होते. MNS campaigning for party building
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी राजसाहेब ठाकरे यांनी देश हितासाठी घेतलेला निर्णय आपल्या सर्वांना मान्य आहे. महायुतीच्या प्रचारासाठी मनसे सैनिक संपूर्ण जिल्ह्यात जोमाने काम करत आहेत. सुनील तटकरे व नारायण राणे यांच्यासाठी जिल्ह्यात आपल्याला काम करायचे आहे. इतर पक्षांपेक्षा मनसेचा प्रचार अधिक जोमाने झाला पाहिजे. याची दखल तटकरे व राणे साहेबांना पुढील काळात घ्यावी लागेल अशा प्रकारचे काम आपल्याला संपूर्ण जिल्ह्यात करावयाचे आहे. गुहागरमध्ये तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी हे गावागावात विकास कामे करत आहेत. गरजू व गरीब लोकांना मदत करत आहेत. त्यांनी दिलेले योगदान वाया जाऊ नये यासाठी लोकसभेसाठी मोठे मताधिक्य देण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. असे आवाहन त्यांनी केले. NS campaigning for party building
गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी म्हणाले की, देशातील योग्य निर्णय घेण्यासाठी खासदारांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या देशासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची असून मनसे अध्यक्ष राज साहेबांनी घेतलेल्या निर्णयानुसार महायुतीसाठी काम करणे गरजेचे आहे. या लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेची तयारी करणे तेवढेच गरजेचे आहे. आलेल्या संधीचे सोने करण्याची गरज आहे. लोकसभा ही विधानसभेचे नांदी असते, त्यानुसार मनसे सैनिकांनी आतापासूनच जोमाने कामास लागले पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी याचा कसा उपयोग होईल हे पाहणे तेवढेच गरजेचे आहे. राज साहेबांच्या आदेशाचे पालन करून महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी शंभर टक्के प्रामाणिक व एकजुटीने काम मनसे सैनिकांनी केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी चिखली चांदिवडेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला. MNS campaigning for party building