संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं.३ माटलवाडी येथे शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक दोन घेण्यात आला. गेली महिनाभर विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहकार्याने केलेली शाळा पूर्वतयारी यावेळी कृतीतून वेगवेगळ्या उपक्रमाने पाहण्यात आली.यानंतर शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेच्या लाभ सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आला. Newcomers welcome at Kudli School

शाळेत नव्याने दाखल झालेले शिक्षक श्री महेश खारतोडे व श्री. गणेश पाडवी यांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. राजेश वनये, माजी उपसरपंच श्री. पांडुरंग थोरसे, उपाध्यक्षा सौ. संजीवनी थोरसे, वैदेही चव्हाण, मुख्याध्यापक सुहास गायकवाड, पदवीधर शिक्षिका सौ. प्रमोदिनी गायकवाड, उपशिक्षक श्री.महेश खारतोडे, श्री.गणेश पाडवी यासह बहुसंख्य पालक उपस्थित होते. यावेळी शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. Newcomers welcome at Kudli School