26 रोजी पुण्यात खेळाडूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन
रत्नागिरी ता. 21 : वरिष्ठ गट राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा २०२५ खुल्या राज्य निवड चाचणी चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, गुलटेकडी, पुणे- ४११०३७ येथे २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. तरी जिल्ह्यातील वरिष्ठ गटातील इच्छुक खेळाडूंनी या ठिकाणी सकाळी 8 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन प्र. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले आहे. National Volleyball Tournament


वरिष्ठ गट राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा २०२५ खुल्या राज्य निवड चाचणीबाबत राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल या खेळप्रकारातील अधिकृत एकविध खेळ संघटना कार्यरत नसल्याने भारतातील व्हॉलीबॉल खेळाच्या प्रसार व प्रचाराचे काम सुरळीत रहावे यासाठी इंडियन ऑलिंपिक असोशिएशनव्दारा अॅडहॉक समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. अॅडहॉक कमिटी व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडीया यांच्याद्वारा दिनांक ७ ते १३ जानेवारी २०२५ या कालावधीत जयपुर, राजस्थान या ठिकाणी सन २०२५ मधील वरीष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रस्तावित राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड करण्याची जबाबदारी आयोजन समितीस देण्यात आलेली आहे. National Volleyball Tournament
या निवड चाचणी दरम्यान निवास व भोजनाची व्यवस्था खेळाडूंनी स्वतः करायची आहे, व्हॉलीबॉल खेळाच्या खेळाडूंना (पुरुष / महिला ) उक्त निवड चाचणीकरीता उपस्थित राहण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा पुणे विभागाचे उपसंचालकांनी केले आहे. National Volleyball Tournament