गुहागर, ता. 02 : श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयांमध्ये विविध उपक्रमांव्दारे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यामध्ये पोस्टर प्रेसेंटेशन, विज्ञान आकृती स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर सी. वी.रमण यांच्या जीवन चरित्रावर आधारित व्हिडिओ दाखवण्यात आला. National Science Day at Palshet
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुकुल प्रमुख श्री. ढेंबरे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी ज्ञान प्रबोधिनी शाखा चिपळूण येथील प्राध्यापक श्री. माधव मुसळे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आठवी व नववीच्या वर्गासाठी ‘निरीक्षण कसे करावे’ या विषयावर मार्गदर्शन केले .तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी निरीक्षणाचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विज्ञान रंजन स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. National Science Day at Palshet
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री.जोगळेकर सर यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विज्ञान विभाग प्रमुख सौ.कुंभार मॅडम तसेच इतर विज्ञान शिक्षक यांनी सहकार्य केले. यावेळी प्रशालेच्या माननीय पर्यवेक्षिका सौ. ढेरे मॅडम उपस्थित होत्या. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शौर्या असगोलकर व स्वरा जोशी यांनी पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच कुमारी स्नेहल आगरे हिच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. National Science Day at Palshet