आर्किटेक, प्रविण काटवी यांच्या स्मरणार्थ दि. १० मार्च रोजी आयोजन
गुहागर, ता. 08 : कोकण ही कलेची पंढरी म्हणून ओळखळी जाते. याच कोकणात नमन , जाखडी नृत्य ही लोककला फेमस आहे. नमन ही महाराष्ट्रामधील एक लोककला आहे. लोककलेला वाव मिळाला आणि कोकणातील कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळाली म्हणून कोकणच्या मातीत स्थापित झालेला व नव्याने ओळख असलेला कलामंच म्हणजे “साई माऊली कलामंच” (मुंबई). यांचा नमनाचा दुसरा प्रयोग रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वा. मराठी साहित्य संघ मंदिर, चर्नी रोड, (मुंबई ) येथे आयोजित केला आहे. या नमना दरम्यान दमदार खेळे, श्री गणेश आराधना, गण, राधा – कृष्णाची प्रेमलीला, गवळण, पेंद्या वाकड्याची आगळी वेगळी धमाल आणि धार्मिक वगनाट्य “साईलीला” या नमनात दाखविण्यात येणार आहे. Naman of “Sai Mauli Kalamanch”
या कलामंचाचे यशस्वी कलाकार पुन्हा एकदा सज्ज झाले असून कोकणची लोककला जपणारा एक मराठमोळा कार्यक्रम. लेखक/सुत्रसंचालन/गीतरचना – सचिन ठोंबरे, दिग्दर्शक – रमेश ठोंबरे , गायक – संदेश पालकर, गायिका – शिवन्या मांडवकर, मृदंग – दिलीप आंबेकर, ढोलकीपटटू – समिर मास्कर, संगीतकार – संदेश आंबेकर/प्रमोद आंबेकर, बॅंन्जो – अजय धनावडे, पॅड – कुंदन साळवी, नृत्यांगना – दिपाली आंबेकर, रंजना म्हाब्दी, अंकिता गोणबरे, प्रियांका आंबेकर, साक्षी डिंगणकर, विचार्ती ठोंबरे, हिरण्या आंबेकर तसेच इतर सह कलाकार आहेत. विशेष सहकार्य सन्मा. श्रद्धा काटवी मॅडम यांचे लाभले आहे. Naman of “Sai Mauli Kalamanch”
“नमन” या लोककलेवर प्रेम करणा-या तमाम कोकणवासीय, मुंबईकर, रशीक प्रेक्षकांनी सहकुटुंब, सहपरिवार समवेत उपस्थित राहुन हा कार्यक्रम पहावा असे कलामंचातर्फे आव्हान करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सचिन ठोंबरे – ९९२०७८२३८१ , रमेश ठोंबरे – ७३०४२३६१९६ , नरेश मोरे – ७०३९४९८६९९ यांच्याशी संपर्क साधावा. Naman of “Sai Mauli Kalamanch”