गुहागर, ता. 15 : मच्छिमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमार करताना मासेमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. हृदय विकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे, विजेचा धक्का लागणे, इत्यादी आपत्तीमध्ये प्राथमिक उपचार काय करावे या बद्दलची शास्त्रीय माहिती मासेमारांना असणे गरजेचे आहे. जेणेकरून संभाव्य धोक्यामुळे होणारे नुकसान टाळता येते अथवा कमी करता येते. या अनुषंगाने मच्छिमारांना सागरी सुरक्षेचे या विषयाचे महत्व ओळखून कोडं कारुळ येथील मासेमारांना रिलायन्स फाउंडेशन, नागरी संरक्षण दल रत्नागिरी, महाराष्ट्र शासन व मत्स्य व्यवसाय विभाग, गुहागर, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले. Marine Safety Training at Kond Karul


या कार्यक्रमासाठी नागरी संरक्षण दल, रत्नागिरी कार्यालयाचे सहाय्यक उपनियंत्रक श्री. प्रशांत कांबळे, श्री. ए. एन. गढरी, रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक, श्री राजेश कांबळे, कृषी तज्ञ संकेत पवार उपस्थित होते. समुद्रामध्ये मच्छिमारांना हृदय विकाराचा झटका आल्यास व पाण्यात बुडाल्यास, विजेचा धक्का लागल्यास, साप चावल्यास मासेमारांना हाताळायच्या विविध शास्त्रीय पद्धती प्रात्यक्षिकासहित समजावून सांगितल्या तसेच कृत्रिम श्वासोश्वास, CPR म्हणजे हृदय विकाराचा झटका आलेल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वासाद्वारे दिलासा कसा द्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच मच्छिमारांना प्राथमिक उपचार कसे द्यावेत या बद्दल माहिती देण्यात आली. मच्छिमार महिलांना गॅस सिलेंडर लीक झाल्यास काय करावे, तसेच शॉक लागल्यास काय काळजी घ्यावी याची माहिती नागरी संरक्षण दलाचे श्री. कांबळे व श्री गढरी यांनी दिली. Marine Safety Training at Kond Karul


मत्स्य व्यवसाय विभागाचे सागरी सुरक्षा पर्यवेक्षक, श्री. विनायक शिंदे यांनी मच्छिमारांना प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजना, सिंधुरत्न योजना, नोकेचे कागदपत्रे अद्ययावत ठेवणे बाबत मार्गदर्शन केले. श्री.मुरलीधर गोविंद जागकर, वनपरिमंडळ अधिकारी यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व कार्यक्रमाचे नियोजन केले. Marine Safety Training at Kond Karul


यावेळी सौ.निलिमा प्रताप अडूरकर, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोंड कारुळ, श्री.सतिश गंगाजी धोपावकर, सदस्य अखिल भारतीय मच्छीमार संघटना मुंबई, श्री.मधुकर यशवंत भाटकर, विश्वस्त हनुमान मंदिर कोंड कारुळ, श्री.साईनाथ मारुती भाटकर, श्री.महेश सावळाराम पावरी, श्री.रुपेश दत्ताराम पालशेतकर, श्री.उमेश सावळाराम पावरी, श्री.मनोज मधुकर वरवटकर, श्री.प्रताप जनार्दन अडूरकर, श्री. जयवंत भाऊ जागकर, श्री.भुषण रामदास जागकर व. इतर तांडेल खलाशी वर्ग व दत्तकृपा महिला मंडळ पाखाडीवाडी व ग्रामस्थ मंडळ कोंड कारुळ कार्यक्रमास मच्छिमार बंधू भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सदर कार्यक्रमाचे नियोजन गुहागर तालुक्याचे, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी श्री स्वप्निल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. Marine Safety Training at Kond Karul