संदेश कदम, आबलोली
रत्नागिरी, ता. 13 : चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि व कृषी संलग्न महाविद्यालय, खरवते दहिवली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, तसेच अॅग्रीव्हिजन कोंकण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने मातृ सुरक्षा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचेवतीने डॉ.वर्षा खानविलकर जनरल फिजीशीअन, सावर्डे यांचे ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. Mother Safety Day at Dahivali
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.सुनितकुमार पाटील, विभाग प्रमुख प्रा.अश्विनी जाधव या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी खासदार, शिक्षण महर्षी गोविंदरावजी निकम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे स्वागतानंतर डॉ.खानविलकर यांनी विद्यार्थिनींकरिता आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. मृणालिनी चिंचोरे हिने तर आभारप्रदर्शन कु.सानिका जाधव यांनी केले. Mother Safety Day at Dahivali
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचेवतीने प्रा.पी.बी.पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले तर इतर प्राध्यापिका, शिक्षकेतर महिला कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक व इतर विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मा.प्राचार्य यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तर विभाग प्रमुख प्रा.हरिश्चंद्र भागडे, प्रा.सुशांत कदम, रा.से.यो.आणि अॅग्रीव्हिजन कोंकण विभाग च्या विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी विशेष मेहनत घेतली. Mother Safety Day at Dahivali