गुहागर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढणार : वैभव खेडेकर
गुहागर, ता. 05 : गुहागर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढणार असून गुहागर विधानसभेसाठी उमेदवार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांच्या नावाची पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे शिफारस करणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा हॉटेल शांताई येथे संपन्न झाला. या मेळाव्यानंतर सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी पत्रकाराची संवाद साधला. गुहागर, चिपळूण, खेड येथील पदाधिकाऱ्यांनी प्रमोद गांधी यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी केल्याचे ते म्हणाले. MNS office bearers should meet


महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष महाराष्ट्र मध्ये सातत्याने वाटचाल करणारा पक्ष आहे. गुहागर विधानसभेमध्ये चार ते पाच वर्ष प्रमोद गांधी यांच्यासारखा तरुण सातत्याने पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांची प्रमोद गांधी यांना उमेदवारी मिळावी म्हणून इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र मध्ये २०० ते २२५ एवढ्या जागा लढणार असून त्याची व्युहरचना तयार झाली आहे. कोकणामध्ये महाराष्ट्र नवनिर्मण सेना दापोली विधानसभा, गुहागर विधानसभा, संगमेश्वर विधानसभा, राजापूर विधानसभा, तसेच सिंधुदुर्गमध्ये दोन विधानसभा, रायगडमध्ये महाड, श्रीवर्धन या ठिकाणी निवडणूक निवडणुकीची चाचपणी करून आपले उमेदवार उभे करणार आहे आणि ज्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे नसतील त्या ठिकाणी त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल असेही खेडेकर यांनी पत्रकार परिषद सांगितले. MNS office bearers should meet
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकणचे सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा सचिव संतोष नलावडे, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, चिपळूण तालुका अध्यक्ष विश्वनाथ डोळस,चिपळूण शहराध्यक्ष अभिनव भुरण, गुहागर शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष उमेश लटके, शेतकरी तालुका गुहागर तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे , सहकार सेना चिपळूण तालुका अध्यक्ष विनोद चिपळूणकर, सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी , चिपळूण तालुका सचिव संदेश साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. MNS office bearers should meet