गुहागर, ता. 03 : रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारात मनसेने गुहागर विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांनी “एक पाऊल पुढे”टाकल्याचे दिसून येत आहे. MNS lead in Tatkaren campaign
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी, उप तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, अमित खांडेकर सचिन गडदे, संदेश ठाकूर, गुहागर शहर अध्यक्ष नवनाथ साखरकर, सुरेंद्र निकम व सर्व विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष हे सर्व एकत्रितपणे गावोगावी, वाडीवस्त्यांवर जाऊन महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा प्रचार करत आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी स्वनिधीतून अनेक विकास कामे केली आहेत. गरीब व गरजू लोकांना ते सर्वतोपरी मदत करत आहेत. सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये प्रमोद गांधी यांच्या बद्दल आदर आहे. त्यामुळे या लोकांकडे तसेच मनसेला मानणाऱ्या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. गुहागर विधानसभा मतदार संघांमध्ये मनसेची १३ ते १४ हजार मते असून यामध्ये प्रमोद गांधी यांनी केलेल्या स्वनिधीतून विकास कामांमुळे मतांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. MNS lead in Tatkaren campaign
विधानसभा मतदारसंघातील युवा वर्ग मनसेकडे वळत आहे, याचा फायदा महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मतदानातून होणार आहे. गुहागर तालुक्यातील काळसुर कौंढर येथे झालेल्या सभेत बोलताना प्रमोद गांधी सांगितले की, देशाच्या भवितव्याचे जडणघडण करण्याच्या दृष्टिकोनातून ही लोकसभेची महत्त्वपूर्ण निवडणूक असून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या पाठीशी मतदान रुपी ताकद सर्वांनी उभी करायची आहे. या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी महायुतीचे प्रत्येक उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी मनसे सैनिकांचे प्रचारात एक पाऊल पुढे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी झाल्याने महायुतीची ताकद वाढली आहे. साधारणपणे लाखो मतांच्या मताधिक्याने सुनील तटकरे निवडून येतील असा विश्वासही प्रमोद गांधी यांनी व्यक्त केला. MNS lead in Tatkaren campaign