गुहागर, ता. 14 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त गुहागर मधील गुणवंत महिलांचा गौरव करण्यात आला. विधानसभा क्षेत्र चषक क्रिकेट स्पर्धा जानवळे फाटा येथील गोल्डन पार्क मैदान येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. MNS honors women
या सत्कारामध्ये पालपेणे तळ्याचीवाडी येथील नवोदित गायिका कु. रिया रघुनाथ बैकर, महावितरण शाखा श्रृंगारतळी येथे उत्कृष्ठ सेवा करणारी महिला वीज कर्मचारी कु.उर्मिला प्रदीप म्हादब, तसेच २१ वी रत्नागिरी जिल्हा अजिंक्य ज्युदो स्पर्धा २०२३ मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणारी कु. आस्था महेश घाणेकर या सर्वांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी, सुरेन्द्र निकम, सुजित गांधी, अमित खांडेकर , प्रीतम सुर्वे, सुहास चोगले, सुयोग कुंबडे ,दिपक सुवै, सुजित गांधी, शुशांत कोळंबेकर,व मनसे सैनिक मान्यवर उपस्थित होते. MNS honors women