गुहागर, ता. 12 : पोलीस परेड मैदानावर येथील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय व्याडेश्वर महोत्सवाला गुहागरवासीयानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चमचमीत खाद्यपदार्थांचे स्टॉल, लहान मुलांसाठी खास खेळण्यांचे आकर्षण, विनोदी आणि प्रेक्षकांना खेळवून ठेवणारे सूत्रसंचालन यामुळे या महोत्सवात आणखीनच रंगत आणली. या महोत्सवात देवस्थानने २६९ स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. Vyadeshwar Festival
दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य व शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात क्रियाशीलपणे काम करणाऱ्या श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या वतीने दरवर्षी महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच स्थानिक व पर्यटकांच्या करमणुकीसाठी व्याडेश्वर महोत्सवाचेही आयोजन केले जाते. या महोत्सवाचे नगरपंचायतीचे अमित वानखेडे यांच्या उपस्थितीत देवस्थानचे माजी अध्यक्ष अरुण परचुरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. स्थानिक कलाकारांना या महोत्सवात विविधांगी नृत्य सादर करण्याची संधी देवस्थानने उपलब्ध करून दिली. देवस्थानने आपल्या धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक कार्यातही देवस्थानचा मोठा वाटा आहे. Vyadeshwar Festival
महोत्सवात पहिल्या दिवशी नृत्य साधना कथ्थक अकॅडमी गुहागर यांनी गणेश वंदनाने महोत्सवाची सुरुवात केली. ज्युनियर कॉलेज गुहागर यांनी वारी नृत्य, चिपळूण येथील मॅजिक शो, मिमिक्री, समृध्दी कदम आणि ग्रुप यांनी छ. शिवाजी महाराज, ज्युनियर कॉलेज गुहागर यांनी मंगळागौर, सागरकन्या ग्रुप असगोली यांनी कोळी गीत, हौशी कलाकार तमाशा मंडळ वरचापाट यांचे सकासुर, दुसऱ्या दिवशी नृत्य झंकार गुहागर भरत नाट्यम, केडीसी ग्रुप असगोली यांचा डान्स, पुणे येथील सदाबहार व्हायोलीन गीत, रिगल कॉलेज शृंगारतळी यांचे वारकरी गजर, इंद्रधनू शृंगारतळी यांनी मंगळागौर, कोळी गीत, लावणी, एकवीरा आई ग्रुप यांनी कोळी गीत रिमिक्स, व्याघ्राबरी ग्रुप गुहागर यांनी मखाना वेडिंग गीत, मळण येथील आखाडा, पालखी नृत्य, वेळंब येथील संकासूर तर शेवटच्या तिसऱ्या दिवशी शहरातील दुर्वा नाटेकर हिने जय जय राम गीतावर नृत्य सादर केले. संस्कृती ग्रुप चिपळूण यांनी मंगळागौर, कलारजनी डोंबिवली, कलाविषकर देवरुख यांनी गर्जा महाराष्ट्र माझा आणि राजहंस नमन मंडळ रांजाणेवाडी यांच्या संकासुराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तीन दिवस विविध शाकाहारी पदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते. अलाक्यू स्टॅच्यू स्टॅचू ग्रुप ऑफ बांदा यांच्यावतीने गेले तीन दिवस स्टॅच्यू राहून प्रक्षकांची मने जिंकली. नमनाच्या कार्यक्रमांनी या महोत्सवाची सांगता करण्यात आली. Vyadeshwar Festival
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी देव व्याडेश्र्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे, खजिनदार सर्वेश भावे, सचिव प्रथमेश दामले, विश्वस्त प्रकाश भावे, सिध्दीविनायक जाधव, मयुरेश आठवले, श्रीधर आठवले, गजानन मोरे, अभिजीत भिडे, हेमंत बारटक्के, सचिन मुसळे, मनीष कामेरकर, केदार खरे यांचे योगदान लाभले. तसेच या कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी सूत्रसंचालक जीवनश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे, निलेश गोयथळे, दीपक देवकर, प्रा. मनाली बावधनकर, कृपाल परचुरे, अवधूत संगमिस्कर यांनी पुढाकार घेतला. Vyadeshwar Festival