निलेश मोरे यांनी केले विशेष अभिष्टचिंतन
गुहागर, ता. 26 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा जिल्ह्याचे विशेष म्हणजे कंदी पेढा. या कंदी पेढ्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाची गोडी वाढविली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सातारा शहर प्रमुख नीलेश मोरे यांनी मंत्री सामंत यांचा वाढदिवसाला कंदी पेढ्यांचा हार घालून विशेष अभिष्टचिंतन केले. मंत्री उदय सामंत यांचेही साताऱ्यावर विशेष प्रेम असून, त्यांनी साताऱ्यातील उद्योगधंद्यांना सक्षमपणे साथ दिली आहे. Minister Samanta’s Birthday
उदय सामंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे. शिंदे गटातील वजनदार नेते म्हणून उदय सामंत यांच्याकडे पाहिले जाते. अत्यंत विश्वासू असलेल्या मंत्री सामंत यांनीही उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास अखंडपणे जोपासत, शिंदे गटाला ऊर्जावान बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्री सामंत यांचा वाढदिवस अपूर्व उत्साहात साजरा झाला. मंत्री सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन उदय सामंत मित्र समूहाच्या वतीने केले होते. रक्तदान शिबिरे, तसेच रत्नागिरीमधील वेगवेगळ्या स्थळांना भेटी अशी विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक नीलेश मोरे हे मूळचे गुहागर तालुक्यातील पिंपर गावाचे सुपुत्र आहेत. त्यांची रत्नागिरी जिल्ह्याशी चांगलीच नाळ आहे. या बांधिलकीमुळेच निलेश मोरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने उदय सामंत यांच्या सत्कारासाठीच कंदी पेढ्यांचा हार घेऊन रत्नागिरीला आले होते दरम्यान, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीचा दर्जा सुधारणे तसेच नवीन उद्योगांना आमंत्रण देण्याच्या दृष्टीने सुद्धा काही मागणी प्रस्ताव देणार असल्याचे मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. Minister Samanta’s Birthday
यावेळी त्याचे सोबत रूपेश संकपाल (चेअरमन शिवनंदन बायोटेक, सातारा), मनोज देवळे, धीरज संकापाळ, अमोल खुडे (उपशहरप्रमुख,सातारा), प्रतीक काळे, निलेश वाघमारे (उद्योजक, सातारा), संकेत नवघने, सचिन हेंड्रे, आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते. Minister Samanta’s Birthday