• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सातारी कंदी पेढ्याने वाढविली मंत्री सामंतांच्या वाढदिवसाची गोडी

by Ganesh Dhanawade
December 26, 2024
in Ratnagiri
145 2
0
Minister Samanta's Birthday
285
SHARES
814
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

निलेश मोरे यांनी केले विशेष अभिष्टचिंतन

गुहागर, ता. 26 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा जिल्ह्याचे विशेष म्हणजे कंदी पेढा. या कंदी पेढ्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाची गोडी वाढविली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सातारा शहर प्रमुख नीलेश मोरे यांनी मंत्री सामंत यांचा वाढदिवसाला कंदी पेढ्यांचा हार घालून विशेष अभिष्टचिंतन केले. मंत्री उदय सामंत यांचेही साताऱ्यावर विशेष प्रेम असून, त्यांनी साताऱ्यातील उद्योगधंद्यांना सक्षमपणे साथ दिली आहे. Minister Samanta’s Birthday

उदय सामंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे. शिंदे गटातील वजनदार नेते म्हणून उदय सामंत यांच्याकडे पाहिले जाते. अत्यंत विश्वासू असलेल्या मंत्री सामंत यांनीही उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास अखंडपणे जोपासत, शिंदे गटाला ऊर्जावान बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्री सामंत यांचा वाढदिवस अपूर्व उत्साहात साजरा झाला. मंत्री सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन उदय सामंत मित्र समूहाच्या वतीने केले होते. रक्तदान शिबिरे, तसेच रत्नागिरीमधील वेगवेगळ्या स्थळांना भेटी अशी विविध कार्यक्रमांची रेलचेल होती.  उपमुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक नीलेश मोरे हे मूळचे गुहागर तालुक्यातील पिंपर गावाचे सुपुत्र आहेत. त्यांची रत्नागिरी जिल्ह्याशी चांगलीच नाळ आहे. या बांधिलकीमुळेच निलेश मोरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने उदय सामंत यांच्या सत्कारासाठीच कंदी पेढ्यांचा हार घेऊन रत्नागिरीला आले होते दरम्यान, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीचा दर्जा सुधारणे तसेच नवीन उद्योगांना आमंत्रण देण्याच्या दृष्टीने सुद्धा काही मागणी प्रस्ताव देणार असल्याचे मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. Minister Samanta’s Birthday

यावेळी त्याचे सोबत रूपेश संकपाल (चेअरमन शिवनंदन बायोटेक, सातारा), मनोज देवळे, धीरज संकापाळ, अमोल खुडे (उपशहरप्रमुख,सातारा), प्रतीक काळे, निलेश वाघमारे (उद्योजक, सातारा), संकेत नवघने, सचिन हेंड्रे, आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते. Minister Samanta’s Birthday

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMinister Samanta's BirthdayNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share114SendTweet71
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.