गुहागर, ता. 01 : बाल भारती पब्लिक स्कूलचा सहा दिवसीय ‘वार्षिक गुणगौरव सोहळा ’ नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. यावेळी उपस्थितांचे स्वागत व सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुरजीत चटर्जी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाल भारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजित चटर्जी सर, बाल सभा प्रमुख सौ.धनश्री बावधनकर मॅडम, सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. Merit ceremony of Bal Bharti School
पहिल्या पुष्पाच्या वार्षिक गुण गौरव समारंभासाठी प्रमुख पाहुणे श्री. श्रीनिवास राव, डीजीएम, आरजीपीपीएल, श्री आणि सौ. घाग तसेच श्री. पियुष कुमार व श्रीम. नेहा कुमारी, श्री, आणि सौ. तांबट, सौ. नीतू पुष्पन, पिटीए, जनरल सेकेटरी उपस्थित राहून त्यांनी विविध खेळात यश मिळवणारे विद्यार्थी त्याचबरोबर बाल सभा उपक्रमामध्ये इयत्ता ३ री व ४ थीतील यश मिळवणारे विद्यार्थी यांचा प्रमाणपत्र देऊन गुणगौरव केला.


दुसऱ्या पुष्पाच्या वार्षिक गुण गौरव समारंभासाठी सन्माननीय पाहुणे श्री. परिक्षित पाटील, तहसिलदार, गुहागर, बार असोशिएशन वकील श्री. संकेत साळवी, पत्रकार श्री. गणेश धनावडे, गुहागर, श्री आणि सौ. राजेश पटेल, श्री आणि सौ. लतीश कचरेकर, श्री आणि सौ.दिलेश मुकर तसेच श्री आणि सौ. संजय धामणस्कर उपस्थित राहून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणारे विद्यार्थी यांना चषक व प्रमाणपत्र त्याचबरोबर बाल सभा उपक्रमामध्ये इयत्ता ५ वी व ६ वीतील यश मिळवणारे विद्यार्थी यांचा प्रमाणपत्र देऊन गुणगौरव केला.
तिसऱ्या पुष्पाच्या वार्षिक गुण गौरव समारंभासाठी सन्माननीय पाहुणे श्री आणि सौ. लंकेश गजभिये, श्री आणि सौ.संसारे, श्री आणि सौ.पाटील तसेच सौ. अलका गमरे उपस्थित राहून चित्रकला स्पर्धा, मराठी निबंध स्पर्धा, उत्कृष्ट वाहक यामध्ये यश मिळवणारे विद्यार्थी यांना चषक व प्रमाणपत्र त्याचबरोबर बाल सभा उपक्रमामध्ये इयत्ता ७ वी, ८ वी व ९ वीतील यश मिळवणारे विद्यार्थी यांचा प्रमाणपत्र देऊन गुणगौरव केला. Merit ceremony of Bal Bharti School


चौथ्या पुष्पाच्या वार्षिक गुण गौरव समारंभासाठी सन्माननीय पाहुणे श्री आणि सौ. बशांत प्रकाश, श्री आणि सौ.राहुल शेटे बाल सभा उपक्रमामध्ये इयत्ता १ लीतील यश मिळवणारे विद्यार्थी यांचा प्रमाणपत्र देऊन गुणगौरव केला.
पाचव्या पुष्पाच्या वार्षिक गुण गौरव समारंभासाठी सन्माननीय पाहुणे श्री आणि सौ. बोराळकर, श्री आणि सौ.स्वामी, श्री आणि सौ.पटनाईक उपस्थित राहून बाल सभा उपक्रमामध्ये प्री-स्कूल व प्री-प्रायमरी मधील यश मिळवणारे विद्यार्थी यांचा प्रमाणपत्र देऊन गुणगौरव केला.
सहाव्या पुष्पाच्या वार्षिक गुण गौरव समारंभासाठी सन्माननीय पाहुणे श्री आणि सौ. आयरे, श्री आणि सौ.मालवदे उपस्थित राहून बाल सभा उपक्रमामध्ये प्री-स्कूल व प्री-प्रायमरी मधील यश मिळवणारे विद्यार्थी यांचा प्रमाणपत्र देऊन गुणगौरव केला. Merit ceremony of Bal Bharti School