ज्यात आवड आहे त्यात करिअर करा यश निश्चित; तहसीलदार परिक्षित पाटील
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 11 : इयत्ता १० वी, १२ वी परिक्षेत चांगले गुण संपादन केलेले आपण सर्व गुणवंत, यशवंत विद्यार्थी आहात मी तुमचे अभिनंदन करतो. १२ वी नंतर विद्यार्थ्यांनी करिअरचे पर्याय ठेवायचे आहेत आपले ध्येय्य आपले करिअर निश्चित करायचे आहे आपण ब-याच गोष्टींचा विचार केला पाहिजे तशी आपल्याला संधी आहे या संधीचे सोने केले पाहिजे इयत्ता १० वी, १२ वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून तुंम्ही उत्तीर्ण झालात आपण एका छोट्याशा गोल मध्ये यशस्वी झालो आहोत आयुष्याच्या गोल मध्ये आपण पहिली पायरी गाठलेय, त्यामुळे तुंम्हाला यशाच्या शिखरावर पोहचायचेय हे लक्षात घ्या. प्रवास खडतर आहे यात संधी आपली वाट पहातेय म्हणून तुंम्हाला ज्यात आवड आहे त्यात करिअर करा यात यश निश्चित मिळेल असे आवाहन गुहागर तालुक्याचे तहसीलदार श्री.परिक्षित पाटील यांनी केले. Merit Ceremony by Suyash Computer
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली यांचे संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व शारदा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून, दिपप्रज्वलन करुन प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर इयत्ता १० वी, १२ वीच्या परिक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. Merit Ceremony by Suyash Computer
यावेळी मार्गदर्शन करताना गुहागरचे तहसीलदार श्री.परिक्षित पाटील पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनो स्वतः हून काही करायचे ते ठरवा, माझा मित्र करतोय ते चांगलं आहे की, आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. मोबाईल चांगल्या कामासाठी वापरा करिअरच्या पुढच्या टप्प्यात जाण्याचा प्रयत्न करा विचार करा, जे मी करिअर निवडले ते योग्य आहे का? आणि मग तयारी करा डॉक्टर, वकील, अॅग्रीकल्चर, इंजिनिअर, बिझनेसमॅन अशी अनेक करिअर आहेत. भविष्यात मी माझ्या एरियात काय करु शकतो याचाही विचार करा आणि करिअर निश्चित करा तुंम्हाला स्पर्धा परीक्षेत व अन्य परिक्षेत मार्गदर्शन करणारे संदेश साळवी यांनाही मी धन्यवाद देतो. असे मौलिक मार्गदर्शन गुहागरचे तहसीलदार श्री.परिक्षित पाटील यांनी केले. Merit Ceremony by Suyash Computer
यावेळी आबलोलीचे ग्रामसेवक श्री.बी.बी.सुर्यवंशी, जांभारीच्या सरपंच वनिता डिंगणकर, खोडदे सरपंच कुमारी पुजा गुरव, आबलोलीचे मंडळ अधिकारी श्री.आनंद काजरोळकर, समाजसेवक श्री.विलास गुरव, तलाठी श्री.जोशी यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर, तहसिलदार श्री.परिक्षित पाटील, उद्योजक श्री.गजानन साळवी, संदेश साळवी, सरपंच वनिता डिंगणकर, सरपंच कुमारी पुजा गुरव, श्री.विलास गुरव, श्री.दशरथ साळवी, श्री.आनंद काजरोळकर, श्री.बी.बी.सुर्यवंशी, श्री.जोशी आदी.मान्यवर उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक श्री.संदेश साळवी, संचालिका सौ.सावी साळवी, शुभम सावंत, साक्षी सावंत, स्नेहा डावल, ममता डावल, शैलेश पवार, कशीष सावंत ,दिपक कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दशरथ साळवी यांनी केले तर संदेश साळवी यांनी सर्वांचे आभार मानले. Merit Ceremony by Suyash Computer