संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 25 : विधानसभेच्या उमेदवारीसाठी राज्यातील सर्व इच्छुकांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मुलाखती दिल्या आहेत. यात डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून गुहागर तालुक्यातील काताळे गावचे सुपुत्र गणेश कदम यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश जरांगें पाटील यांनी दिल्याने डोंबिवलीकरांना एक तरुण व आक्रमक चेहरा आमदार म्हणून निवडण्याची संधी मिळाली आहे. Maratha society Ganesh Kadam in the arena


रोखठोक आणि प्रेमळ व्यक्तीमत्व अशी गणेश कदम यांची ओळख असून समाजाच्या अनेक आंदोलनं, उपक्रम यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अनेक आंदोलनं, उपोषणं करूनही मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नसतील तर लोकशाही मार्गाने विधानसभेत जाऊन आवाज उठवने गरजेचे असल्याने निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगतले. Maratha society Ganesh Kadam in the arena
डोंबिवली विधानसभेतील मतदारांनी एकदा संधी दिल्यास आरक्षणाच्या मुद्याशिवाय इतर नागरी प्रश्नही सोडवण्यास त्याच जोशात काम करेन असा विश्वास गणेश कदम यांनी मतदारांना दिला व कोणतीही समस्या असल्यास त्यांच्या 8879776282 ह्या मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. Maratha society Ganesh Kadam in the arena