पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश!
गुहागर, ता. 23 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच फटाके फुटत आहेत. जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांतर करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे, अशातच अजित पवार गटाचे राजेश बेंडल यांनी रत्नागिरी मध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपणं प्रवेश केला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. Rajesh Bendal of NCP in Shiv Sena


राजेश बेंडल हे शिवसेने कडून गुहागर विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. या मतदारसंघावर भाजपनेही दावा केला आहे. हा मतदारसंघ पारंपारिकतेने शिंदे शिवसेनेचा आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेतून महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाल्यास आपण सर्व घटक पक्षांना आणि आपल्या कुणबी समाज बांधवांच्या पाठिंब्यावर निश्चितच विजयी होईन असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राजेश बेंडल यांचें पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेत स्वागत केले. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेला तर याठिकाणी राजेश बेंडल हे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. Rajesh Bendal of NCP in Shiv Sena