शृंगारतळीतील जागा मालकाकडून होकार, चेंडू महावितरणच्या कोर्टात
गुहागर, ता. 16 : दोन दिवसांच्या पाठपुराव्यानंतर गुहागर तालुक्यातील खासगी सशुल्क कोविड रुग्णालय सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाला शृंगारतळीतील डॉ. राजेंद्र पवार यांचे सहकार्य लाभले. After 2 Days follow up Make way for Private Paid Covid Hospital in Guhagar. Dr. Rajendra Pawar tooks good efforts for this Hospital.
गुहागर तालुक्यासाठी खासगी सशुल्क कोविड रुग्णालय सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यासाठी शृंगारतळीतील रेनबो लॉज ताब्यात घेण्यासंदर्भातील पत्र ही जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाले होते. मात्र या इमारतीचे मालकांशी संपर्क होत नव्हता. त्याच्याशी बोलणी केल्याशिवाय जबरदस्तीने ही इमारत ताब्यात घेण्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांसह स्थानिक डॉक्टरही तयार नव्हते. त्यामुळे अन्य पर्यायांचा विचारही सुरु होतो. शुक्रवारी (ता. 16) तहसीलदार सौ. धोत्रे यांनी पुन्हा एकदा शृंगारतळीत जावून रुग्णालयासाठी अन्य इमारतींची चाचपणी सुरु केली होती. त्यावेळी डॉ. राजेंद्र पवार यांनी अखेरचा पर्याय म्हणून मुंबईतील भावाला मुंब्रात जावून रेनबोचे मालक कारभारी यांची भेट घेण्यास सांगितले. गुहागर तालुक्यातील कोविड रुग्णालयाचा विषय मार्गी लागला पाहिजे म्हणून पवार डॉक्टरांचा भाऊ थेट मुंब्य्रात पोचला. कारभारी यांच्या घराचा पत्ता शोधुन काढला. तेथे जावून कारभारी आणि पवार डॉक्टरांची बोलणी करुन दिली. त्यावेळी कारभारी यांनी देखील गुहागरमधील जनेतच्या सोयीसाठी विनाअट जागा देण्याचे मान्य केले. शनिवारी जागा ताब्यात देण्यासाठी कारभारी स्वत: मुंब्य्राहून शृंगारतळीला येत आहेत. त्यामुळे इमारत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मात्र या इमारतीचे वीजबील देयक न भरल्याने महावितरणने वीज तोडली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तहसीदार सौ. लता धोत्रे यांची महावितरण उपअभियंता, गुहागर यांचेबरोबर बोलणी सुरु आहेत. आजपर्यंतच्या वीज वापराची नोंद घेवून वीज जोडणी द्यावी. रुग्णालयाची आवश्यकता संपेल मालकाच्या संमतीने इमारत भाड्याच्या रक्कमेतून रुग्णालय व्यवस्थापन जुने वीज बिल भरेल. असा प्रस्ताव महावितरणसमोर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयाचा चेंडू आता महावितरणच्या कोर्टात आहे. कोविड रुग्णालयासाठीचा विषय असल्याने व मालक स्वत: येत असल्याने शनिवारपर्यंत या समस्येवरही तोडगा निघेल असा अंदाज आहे.
गुहागरातील कोरोनासंदर्भात बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोविड रुग्णालयासाठीच्या जागेचा शोध सुरुच
गुहागर तालुक्यात अवघ्या 6 दिवसांत 86 बाधित