पालशेतमधील 98 ग्रामस्थांनी केले लसीकरण
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पालशेत येथे लसीकरणापूर्वी गांधीलमाश्यांनी हल्ला केला. त्यामध्ये 9 जण जखमी झाले. या प्रकारामुळे थोडावेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आजच्या लसीकरणाचा लाभ 98 ग्रामस्थांनी घेतला. लसीकरणानंतर सर्वांची प्रकृती उत्तम होती. In Palshet Vaccination Camp organized by Hedavi Primary Health Centre. Before Vaccination 15 to 20 Hornets attack on People. The Health worker trated bite victims. In this vaccination Program 98 villagers taken the Corona Vaccine Today.


जिल्ह्यात वेगाने लसीकरण व्हावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपकेंद्रावर लसीकरण अभियान राबवले जात आहे. हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या पालशेतमधील उपकेंद्राची इमारत ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आहे. ही इमारत थोडी उंचावर असल्याने वयोवृध्दांना लसीकरणासाठी उपकेंद्रात येणे शक्य होणार नाही. म्हणून हेदवीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालशेत विद्यालयातील एक वर्गखोली द्यावी अशी विनंती केली होती. ही विनंती मान्य करुन रयत शिक्षण संस्थेने पालशेतकर विद्यालयातील एक वर्गखोली वापरण्याची अनुमती दिली. त्यानंतर आज शुक्रवार, 16 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता दशभुज लक्ष्मी गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करुन हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप गुंजोटे यांनी लसीकरण अभियानाचे उद्घाटन केले. यावेळी सरपंच सौ. संपदा चव्हाण, उपसरपंच महेश वेल्हाळ, पालशेतकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज जोगळेकर उपस्थित होते. पालशेतमधील 45 वर्षावरील 98 ग्रामस्थांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.


गांधीलमाश्यांचा हल्ला


लसीकरणापूर्वी अचानक एक दोन गांधीलमाश्या शाळेच्या आवारात आल्या. उपस्थितांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर पाच मिनिटांत 10 ते 15 गांधीलमाशांनी उपस्थितांवर हल्ला केला. पुरुषांनी चटकन आडोशाला धाव घेतली. परंतु महिलावर्गाला धावपळ न करता आल्याने त्या गांधीलमाश्यांच्या कचाट्यात त्या सापडल्या. तीन महिलांवर एकाचवेळी तीन ते चार गांधीलमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेला चार ठिकाणी गांधीलमाश्यांनी दंश केला. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लगेचच दंश केलेल्या मंडळींवर तेथेच उपचार केले. या हल्ल्यामुळे उद्घाटनापूर्वी थोडेसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
लसीकरणाचे नियोजन


हेदवी प्रा. आ. केंद्रामार्फत लसीच्या उपलब्धतेनुसार दर सोमवार व मंगळवार वेळणेश्र्वरमध्ये, बुधवार व गुरुवार अडूरमध्ये आणि शुक्रवार व शनिवार पालशेतमध्ये लसिकरणाचे नियोजन केले आहे. हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार ते शनिवार पूर्ण दिवस लसीकरण होणार आहे. अशी माहिती हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रताप गुंजोटे यांनी दिली आहे.
गुहागरातील कोरोनासंदर्भात बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोविड रुग्णालयासाठीच्या जागेचा शोध सुरुच