गुहागर, ता. 14 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शृंगारतळी येथे चिपळूण अर्बन को. ऑ. बँक चिपळूण यांच्या वतीने ग्राहकांना नेहमीच विनम्र आणि तत्पर सेवा दिली जात असते. या सेवेबरोबरच आपल्या ग्राहकांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी हि बँक पार पाडत आली आहे. बुधवारी बँकेच्या वतीने खातेदार सौ. सिद्धी सचिन कचरेकर यांना महिंद्रा बोलेरो चार वाहन खरेदी करण्यासाठी व शाखा मार्गताम्हाणेच्या खातेदार सौ. अनघा अजित साळवी यांना महिंद्रा बोलेरो तीन वाहन खरेदी करण्यासाठी आपल्या कर्ज वितरीत करण्यात आले. Mahindra Bolero to customers by Chiplun Urban Bank


बँकेच्या वतीने त्या वाहनांची चावी बँकेचं अध्यक्ष श्री. मोहन मिरगल, उपाध्यक्ष श्री. रहिमान दलवाई, संचालक श्री. निहार गुडेकर, श्री. मिलिंद कापडी, श्री.धनंजय खातू, श्री. दीपा देवळेकर, बँकेचे सी. इ. ओ. श्री. तुषार सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. Mahindra Bolero to customers by Chiplun Urban Bank
यावेळी मार्गताम्हाणे शाखेचे जागा मालक श्री. अजित साळवी, शृंगारतळी शाखेचे जागा मालक श्री. गुलाम तांडेल, श्री.गौरव वेल्हाळ, शृंगारतळी शाखेचे शाखाधिकारी श्री. जीवन बाद्रॆ, गुहागर शाखेचे शाखाधिकारी श्री.संतोष संसारे, मार्गताम्हाणे शाखेचे शाखाधिकारी श्री.रुपेश वाडकर, गणेश किर्वे व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. Mahindra Bolero to customers by Chiplun Urban Bank