गुहागर, ता. 09 : कोकणातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव निमित्त रात्री श्रींची हर हर महादेवच्या जय घोषात पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, वारकरी संप्रदाय, स्थानिकांच्या भजनाने मंदिरा भोवती श्रींची पालखीने प्रदक्षिणा घातल्या. या मिरवणुकीत भाविकांसह परदेशी पाहुणे देखील सहभागी झाले होते. Mahashivratri festival at Vyadeshwar temple
श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड यांच्यावतीने महाशिवरात्री उत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गुहागर पोलीस परेड मैदानावर तीन दिवस श्री व्याडेश्वर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री निमित्त सकाळी पूजाअर्चा झाल्यानंतर सुस्वर भजने, रात्री श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंदिराभोवती ढोल ताशांच्या गजरात वारकरी संप्रदाय आणि भजन यांच्या निनादत पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. श्रींच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या मिरवणुकीत परदेशी पाहुणे सर्वांचे आकर्षण ठरले होते. तेही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. Mahashivratri festival at Vyadeshwar temple
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी देव व्याडेश्र्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे, खजिनदार सर्वेश भावे, सचिव प्रथमेश दामले, विश्वस्त प्रकाश भावे, संदीप बारटक्के, सिध्दीविनायक जाधव, मयुरेश आठवले, श्रीधर आठवले, गजानन मोरे, अभिजीत भिडे, हेमंत बारटक्के, सचिन मुसळे, मनीष कामेरकर, केदार खरे यांचे योगदान लाभले. Mahashivratri festival at Vyadeshwar temple