माळवेंचा प्रामाणिकपणा आणि आगाराची तत्परता
गुहागर, ता. 14 : गुहागर आगारात काल परतीच्या प्रवासाची प्रचंड गर्दी होती. यातच एका प्रवाशाला पैशाने भरलेले पाकीट मिळाले. त्यांनी ते गुहागर स्थानक प्रमुख यांच्या ताब्यात दिले. स्थानक प्रमुखांनी त्वरित पुकारणी करून ते पाकीट ज्या माणसाची हरवले होते त्याला परत दिले. Lost wallet found in Guhagar Agar


शुक्रवारी परतीच्या वाहतुकी दरम्याने सुधीर रामचंद्र साळवी रा. पालशेत, या प्रवाशाचे पाकीट हरवले होतो. त्यात मोठी रोख रक्कम व महत्त्वाच्या वस्तू होत्या. हे पाकीट गुहागर एसटी बस स्थानकात पडले. स्थानकावर आलेले प्रवासी सुनील किसन माळवे कामाख्या कंपनी, चेन्नई यांना सापडले. मालवे यांनी या वस्तू स्थानक प्रमुख यांच्या ताब्यात आणून दिल्या. यानंतर स्थानक प्रमुखांनी तात्काळ दोन्ही क्षेपणावरून पुकारणी केल्यानंतर साळवी यांच्याशी संपर्क केला व त्यांचे पाकीट त्यांना परत देण्यात आले. यावेळी प्रवासी सुधीर साळवी यांनी सुनील मालवे व रा प गुहागर आगार प्रशासन अधिकारी यांचे आभार मानले. यावेळी स्थानक प्रमुख स्वप्निल शिंदे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री सुनील पवार, पालक अधिकारी राजेश पाथरे हे उपस्थित होते. Lost wallet found in Guhagar Agar