संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 20 : चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते दहिवली येथे दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साहित्य व कला भित्तिपत्रकाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून या भित्तिपत्रकाकरिता विविध कला साहित्य कृतीने भरभरुन प्रतिसाद मिळाला. Literature Art Mural Unveiled at Dahivali


यामध्ये विद्यार्थ्यांकडुन विविध मुक्तछंदपर कविता,चारोळी,उत्कृष्ट रचना चित्रे,अभ्यासपूर्ण लेख,संवाद लेखन,कथा लेखन व इतर नाविन्यपूर्ण साहित्य रचनेचे प्रदर्शन करण्यात आले.कृषि अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व आजकाल लोप पावत चाललेल्या साहित्य रचनेला चालना मिळावी,विद्यार्थ्यांमध्ये साहित्य रचनेविषयी रस निर्माण व्हावा,या उद्देशातून हा कार्यक्रम प्रा.संघजा कांबळे यांच्या संकल्पनेतून सूरू करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत या प्रकल्पास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.विक्रांत साळवी,प्रा.सुशांत कदम व विद्यार्थ्यांकडून विशेष मेहनत घेण्यात आली.उपस्थित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गातुन उपक्रमाला भरभरुन दाद मिळाली. Literature Art Mural Unveiled at Dahivali

