• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कृषि महाविद्यालयामध्ये साहित्य कला भित्तिपत्रकाचे अनावरण

by Guhagar News
August 20, 2024
in Ratnagiri
143 2
0
Literature Art Mural Unveiled at Dahivali
281
SHARES
804
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 20 : चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते दहिवली येथे दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साहित्य व कला भित्तिपत्रकाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून या भित्तिपत्रकाकरिता विविध कला साहित्य कृतीने भरभरुन प्रतिसाद मिळाला. Literature Art Mural Unveiled at Dahivali

Literature Art Mural Unveiled at Dahivali

यामध्ये विद्यार्थ्यांकडुन विविध मुक्तछंदपर कविता,चारोळी,उत्कृष्ट रचना चित्रे,अभ्यासपूर्ण लेख,संवाद लेखन,कथा लेखन व इतर  नाविन्यपूर्ण साहित्य रचनेचे प्रदर्शन करण्यात आले.कृषि अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व आजकाल लोप पावत चाललेल्या साहित्य रचनेला चालना मिळावी,विद्यार्थ्यांमध्ये साहित्य रचनेविषयी रस निर्माण व्हावा,या उद्देशातून हा कार्यक्रम प्रा.संघजा कांबळे यांच्या संकल्पनेतून सूरू करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत या प्रकल्पास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.विक्रांत साळवी,प्रा.सुशांत कदम व विद्यार्थ्यांकडून विशेष मेहनत घेण्यात आली.उपस्थित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गातुन उपक्रमाला भरभरुन दाद मिळाली. Literature Art Mural Unveiled at Dahivali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLiterature Art Mural Unveiled at DahivaliMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share112SendTweet70
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.