रत्नागिरी, ता. 27 : रत्नागिरीतील मुलांना शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळण्यासाठी शांत आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण असले पाहिजे. बराच वेळ, एक चित्ताने स्वयं-अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी अजित राणे यांनी सुरू केलेली कृष्णज्योत अभ्यासिका खूपच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी केले. माळनाका येथील केएसपी अॅलेक्सा इमारतीमध्ये अभ्यासिकेचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. यावेळी डॉ. स्वप्नजा मोहिते, हॉटेल व्यावसायिक सुहास ठाकुरदेसाई, उद्योजक गौरांग आगाशे यांच्यासमवेत उदय काजरेकर, सीए नयन सुर्वे, विनायक परब, सौ. पूजा परब आणि निहारिका परब आदी मान्यवर उपस्थित होते. Krishnajyot Abhaysika inaugurated in Ratnagiri


डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी सांगितले की, ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त असून या निमित्ताने विद्यार्थी अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळेल. इथे बसून विद्यार्थी शांतपणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकतील. येथे कोणताही व्यत्यय येणार नाही. स्पर्धा परीक्षेत आपण कमी पडतो, ते दूर करण्यासाठी ही अभ्यासिका फायदेशीर आहे. Krishnajyot Abhaysika inaugurated in Ratnagiri


या वेळी श्री. राणे म्हणाले की, मला लहानपणी अभ्यास करण्याकरिता शांत जागा शोधावी लागत होती. रत्नागिरीतही अशी स्थिती आहे. सातत्याने किमान आठ ते दहा तास अभ्यास करण्याकरिता तसे वातावरण लागते. यासाठी मी कृष्णज्योत अभ्यासिका सुरू केली आहे. यामध्ये एका वेळी ३० जणांना अभ्यास करता येईल. सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत अभ्यासिका सुरू राहणार असून यात मोफत वाय फाय, एसी, स्वतंत्र टेबल, लॅपटॉप, शैक्षणिक साहित्यासाठी सुविधा दिल्या आहेत. सीसी टीव्ही, इन्व्हर्टर बॅकअप, मुली, महिलांसाठी राखीव जागा, लॉकर, अॅक्वागार्डचे गार-गरम पाण्याची सुविधाही आहे. करिअरसंदर्भातही मार्गदर्शन केले जाणार असून येथे ग्रंथालयात काही महत्त्वाची पुस्तकेही आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घेऊन यश मिळवावे. Krishnajyot Abhaysika inaugurated in Ratnagiri