• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकण चेंबर ऑफ कॉमर्स ची स्थापना

by Guhagar News
July 17, 2024
in Maharashtra
247 3
0
Konkan Chamber of Commerce
486
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकणातील एक हजार उद्योजकांच्या उपस्थितीत स्थापना

संदीप शिरधनकर, प्रमुख कार्यवाहक, समृद्ध महाराष्ट्र संघटना
Guhagar news : पर्यटन हापूस आंबा मत्स्य उद्योग प्रक्रिया हे कोकणच्या विकासाचे मुख्य विषय आहेत. या उद्योगांमध्ये कोकणात हजारो तरुण काम करत आहेत. ज्या पद्धतीने साखर उद्योग पश्चिम महाराष्ट्रात विकसित झाला असा सुनियोजित प्रयत्न कोकणात पर्यटन आणि मत्स्य उद्योग आणि फलोद्यांन मध्ये व्हायला हवे. पण गेली 75 वर्ष कोकण दुर्दैवाने दुर्लक्षित आहे आणि त्यामुळे कोकणाच्या या मूलभूत विषयांना आणि यातील उद्योजकांना कोणत्याही स्वरूपाची मदत मिळत नाही. त्यापुढे जाऊन कोकणातील अनेक पर्यावरण पूरक उद्योगांना सहजपणे परवानगी सुद्धा मिळत नाहीत. कोकण विकासाच्या विषयांवर रचनात्मक व्यासपीठ आहे कोकणातील उद्योजकांचे प्रश्न समस्या त्यांना सरकारी योजना मिळाव्यात यासाठी एक व्यावसायिक संघटन हवे म्हणून कोकण चेंबर ऑफ कॉमर्स ची स्थापना करण्यात आली. ग्लोबल कोकण चे अध्यक्ष संजय यादवराव यांनी हे व्यासपीठ निर्माण केले आहे. Konkan Chamber of Commerce

Konkan Chamber of Commerce

या चेंबरच्या स्थापनेला पहिलाच कार्यक्रमात 1000 हून अधिक कोकणातील उद्योजक संपूर्ण कोकणातून आणि मुंबई पुण्यातून सहभागी झाले. कोकणातील बंद घरे, रिकामी होणारी गावे, रिकामी होणाऱ्या शाळा, वेगाने होणारी जमिनीची विक्री हे सर्व थांबवायचे असेल तर कोकणात गावागावात उद्योग उभे राहिले पाहिजेत. आणि यासाठी मुंबई पुण्यातील सक्षम कोकणी उद्योजकांनी आणि कोकणात प्रत्यक्ष काम करणार आहोत  त्यांनी यासाठी  एकत्र यायला हवे, एकमेकांना मदत करायला हवी शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या व्यवस्था उभ्या राहिल्या कोकणातील मूळ विषयांसाठी पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उद्योगांना सहजपणे परवानग्या आणि बँकांकडून योग्य दराने कर्ज पुरवठा झाला पाहिजे. दुर्दैवाने हे कोकणात होत नाही शासकीय यंत्रणांकडून अडवणूक होते. Konkan Chamber of Commerce

Konkan Chamber of Commerce

ही परिस्थिती कोकणवासीयांसोबत घेऊन बदलावी हा निर्धार करून संजय यादवराव चालवत असलेल्या समृद्ध कोकण चळवळीच्या माध्यमातून कोकण चेंबर ऑफ कॉमर्स हे रचनात्मक आणि समृद्ध महाराष्ट्र संघटना हे संघर्षात्मक व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. एका बाजूने शासनाबरोबर आणि शासकीय यंत्रणांबरोबर समन्वय साधताना जिथे अन्याय होईल तिथे आवाज उठवण्याचा निर्धार या कालच्या परिषदेमध्ये करण्यात आला. Konkan Chamber of Commerce

Konkan Chamber of Commerce

कोकण विकासासाठी गेली 25 वर्ष सातत्याने काम करणारे कोकणातील पर्यटन शेती उद्योग मत्स्य उद्योग ग्रामीण उद्योग सर्व उद्योजकांना संघटित करणारे ग्लोबल कोकण सारखा आंतरराष्ट्रीय महोत्सव दरवर्षी आयोजित करणारे संजय यादवराव यांच्या कोकणातील सामाजिक चळवळीला पंचवीस वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने कार्यकर्त्यांच्या वतीने संजय यादवराव यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या चळवळीत सुरुवातीपासून सहभागी असणारे आमदार भाई जगताप आणि आमदार प्रसाद लाड हे आवर्जून यावेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते व अनेक मान्यवर उद्योजकांच्या उपस्थितीमध्ये यावेळी यादवराव यांचा सन्मान करण्यात आला. Konkan Chamber of Commerce

Konkan Chamber of Commerce

पहिल्या दिवशी कोकण चेंबर ऑफ कॉमर्स चे सदस्य 100 उद्योजक झाले हा सुद्धा एक ऐतिहासिक रेकॉर्ड आहे. ही परिषद सात तास बिना ब्रेक सलग चालली. प्रचंड उत्साहामध्ये सर्व कोकणवासी उद्योजक यात सहभागी झाले होते. या चळवळीचे मार्गदर्शक आमदार भाई जगताप आणि आमदार प्रसाद लाड दोघांनीही यावेळी सांगितले की कोकणच्या विषयांमध्ये संघर्ष करण्याकरता किंवा रचनात्मक कामासाठी सर्व पक्षांचे आमदार आम्ही एकत्र येऊन या चळवळीच्या मागे उभे राहू. पण रडल्याशिवाय आई सुद्धा दूध देत नाही त्यामुळे कोकणचे प्रश्न केवळ आमदारांनी न मांडता रस्त्यावर जनतेने सुद्धा मांडले पाहिजे आणि त्याकरता या चळवळीने पुढील काळात पुढाकार घ्यावा. असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. Konkan Chamber of Commerce

आज पर्यंत समृद्ध कोकण चळवळ येथून कोकणात हजारो प्रकल्प गावागावात उभे राहिले. यातील मोठ्या यशोगाथा कोकण विकासाचे उद्योजकतेचे मोठे विषय यांचे सादरीकरण प्रत्यक्ष फिल्म आणि हे प्रकल्प ज्यांनी उभारले त्यांचे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले. कोकणात पर्यटनाची क्रांती करणारे डॉक्टर चंद्रकांत मोकल, युरोप सारखा गाव उभारणारे अविनाश पाटील कोकणातील पहिली वायनरी सुरू करणारे श्रीकांत सावे, कोट्यावधीचा भाजीपाला उद्योग उभारणारे रामू सावे, कोकणातील सर्वात मोठे रिसॉर्ट उभारणारे संदीप घरत, आणि सागर सावलीचे मंगेश मोरे, सागर मोरे बांबू लागवडीचा मोठा प्रकल्प मायकल डिसोजा अशा अनेक मान्यवर उद्योजकांची माहिती आणि फिल्म यावेळी दाखवण्यात आल्या. Konkan Chamber of Commerce

Konkan Chamber of Commerce

ज्यांचा मुख्य सत्कार करण्यात आला त्या संजय यादवराव यांनी सांगितले आजपर्यंत निवेदने शिष्टमंडळ प्रेझेंटेशन या माध्यमातून शासनाकडे आणि अधिकाऱ्यांकडे आपण कोकणचे प्रश्न मांडत आलो पण प्रत्यक्ष प्रश्न सुटताना दिसत नाहीत आणि म्हणून रचनात्मक पद्धतीने मागण्या करताना दुसऱ्या बाजूने या पुढच्या काळात आंदोलने सुरू करण्याचा निर्णय आपण घेत आहोत. पुढील महिन्यात कोकणातील मच्छीमारांचे आणि आंबा बागायतदारांचे मोठे आंदोलन आपण आपल्या चळवळीतून उभारणार आहोत याची घोषणा संजय यादव राव यांनी यावेळी केली. यावेळी कोकणातील वेगवेगळ्या मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी या परिषदेला आवर्जून उपस्थित होते. सर्व कोकणवासीयांनी या संघर्षाच्या कार्यक्रमाला सुद्धा संपूर्ण पाठबळ देण्याचे यावेळी जाहीर केले. यावेळी समृद्ध मराठी नावाचे यूट्यूब चैनल चळवळीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. चेंबरचे वेबसाईटचे उद्घाटन सुद्धा याच कार्यक्रमात झाले. यावेळी अरे नंद हा दुधाचा ब्रँड घोषणा करण्यात आली. कोकण विकासाचे अनेक नवनवीन स्टार्टअप पुढच्या काळात चेंबरच्या माध्यमातून सुरू होणार आहेत. Konkan Chamber of Commerce

या चळवळीतील प्रमुख पदाधिकारी किशोर धारिया अजित मराठे राजस्थानचे माजी कुलगुरू अरुण सावंत, डॉक्टर दीपक परब, डॉक्टर विकास शेट्ये, पितांबरीचे माधव पुजारी, ओम प्रकाश कोळथरकर सुनील आकरेकर प्रशांत सावंत, युयुत्सू. आरते, नरेंद्र बामणे राम कोळवणकर, काशिनाथ तारी, डॉक्टर राजीव भाटकर, प्रशांत सावंत, हरीश बारी, किरण परब आणि अनेक मान्यवर यावेळी सहभागी होते. कोकण चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क विजय. 91 87798 42009 Konkan Chamber of Commerce

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKonkan Chamber of CommerceLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share194SendTweet122
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.