रत्नागिरी, ता. 12 : येथील रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे येत्या ४ मे रोजी रत्नागिरी शहरात तालुकास्तरीय किड्स सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांनी मोबाईलवर गेम खेळण्याऐवजी सुट्टीचा आनंद लुटावा, याकरिता सायकल चालवावी आणि तंदुरुस्त राहावे या उद्देशाने सायक्लोथॉन आयोजित केली आहे. Kids Cyclothon by Ratnagiri Cyclist Club
सुवर्णसूर्य फाउंडेशनने या स्पर्धेसाठी छोटे अंतराळवीर चालवणार सायकल (Little Astronauts on Wheels) अशी संकल्पना मांडली आहे. या उपक्रमामधून खगोल विज्ञानाविषयी भरीव माहिती मिळून शालेय विद्यार्थ्यांच्या मनात एक कुतूहल तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महावीर जयंतीला ही स्पर्धा जाहिर झाली असून हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्त Little Astronauts on Wheels ही संकल्पना जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत विविध शाळांमधील जवळपास १०० हून जास्त विद्यार्थ्यांनी म्हणजेच छोट्या अंतराळवीरांनी सायकल चालवण्यासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये वयवर्षे ६ ते १० साठी ५ किमी व वय वर्ष ११ ते १५ करिता १० किमी अंतर ठेवण्यात आले आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या २०० स्पर्धकांना टी शर्ट मिळणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक मेडल, ई-प्रमाणपत्र तसेच सुरस फूड्स- द फूड कल्चरच्या माध्यमातून नाश्ता देण्यात येणार आहे. Kids Cyclothon by Ratnagiri Cyclist Club


रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची स्थापना मार्च २०२० मध्ये झाली आहे. दरवर्षी क्लबचे सर्व सदस्य मिळून किमान एक लाखांहून अधिक किलोमीटर्सचे सायकलिंग करतात. रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे (द्वितीय) आयोजन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले. त्यानंतर रत्नागिरीत सायकलिंग वाढू लागले. पर्यावरण जागरण, मतदार जनजागृती, हर घर तिरंगा रॅली, वीर सावरकर अभिवादन रॅली, जय गजानन सायकल रॅली, स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव रॅली, सायकल दिन रॅली, फिट इंडिया रॅली अशा विविध सायकल रॅलींचे आयोजन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने वेळोवेळी केले आहे. तसेच सलग दोन वर्षे रोलर कोस्टर सायक्लोथॉन ही राज्यस्तरीय सायकलची स्पर्धाही यशस्वीपणे आयोजित केली आहे. Kids Cyclothon by Ratnagiri Cyclist Club
ग्रहमालेतील ग्रह या ५ आणि १० किमीवर विविध ठिकाणी उभे केले जाणार आहेत. जेणेकरून मुलांना आपण अंतराळात फेरफटका मारतोय की काय असं वाटेल अशा पद्धतीचे नियोजन आहे. सुवर्णसूर्य फाऊंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत स्पोर्ट्स टुरिझममध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना अंमलात आणल्या गेल्या आहेत. कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन ही कोकणवासीयांची स्वप्ने सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या प्रत्येक उपक्रमाच्या नियोजनात आणि संकल्पनेत स्थापनेपासूनच सुवर्णसूर्य फाउंडेशनचे योगदान राहिले आहे. Kids Cyclothon by Ratnagiri Cyclist Club
सायक्लोथॉनसाठी प्रवेशमूल्य १९९ रुपये ठेवण्यात आले आहे. ज्यांना या किड्स सायक्लोथॉनमध्ये सायकल चालवून छोटे अंतराळवीर व्हायची इच्छा आहे, त्या बालदोस्तांनी खालील गुगल फॉर्मवर क्लिक करून माहिती भरून नोंदणी करावी. गुगल फॉर्म लिंक- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd2SDLmtkYQD4-Ln10DMwAzqfCAtrtdaNigiiWFu5c9xg9aOA/viewform अधिक माहितीसाठी दर्शन जाधव (9970398242), विनायक पावसकर (9405773337), ओंकार फडके (9422050762), केदार देवस्थळी (9763639367) यांच्याशी संपर्क साधावा. Kids Cyclothon by Ratnagiri Cyclist Club