• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

by Ganesh Dhanawade
October 31, 2024
in Politics
201 2
3
Joining the party in the presence of Gandhi

गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी मनसे पक्षामध्ये प्रवेश केलेल्या धनंजय विखारे यांचा मनसे पक्षात स्वागत करून सत्कार केला

396
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 31 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर मध्ये इतर पक्षातील कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरू झाले असून मनसेचे उमेदवार व गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी जानवळे येथील धनंजय विखारे, तळवळी येथील अमोल आगरे, ओंकार आगरे, जितेश ताम्हणकर  यांनी मनसे पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी धनंजय विखारे यांना मनसे शृंगारतळी शहर अध्यक्ष पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. Joining the party in the presence of Gandhi

यावेळी बोलताना प्रमोद गांधी यांनी सांगितले की, मनसे पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना योग्य सन्मान दिला जाईल. राज साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन आपण मनसे पक्षामध्ये आला आहात, त्यामुळे मनसे पक्ष जास्तीत जास्त वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करावा. गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी धनंजय विखारे  यांचा मनसे पक्षात स्वागत करून सत्कार केला. यावेळी  उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी, जानवळे शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर, मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी आदी मान्यवर उपस्थित होते. Joining the party in the presence of Gandhi

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJoining the party in the presence of GandhiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share158SendTweet99
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.