रत्नागिरी, ता. 21 : मोबाईलमधील इन्स्टाग्राम अकाउंटवर लिंक पाठवून खेड येथील तरुणाची सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याबाबत येथील पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Online cheating of youth


या प्रकरणी शुभम संदेश शेट्ये (२८ वर्षे) याने येथील पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. शुभम शेट्ये याने मोबाईलवर इन्स्टाग्राम अकाऊंट पाहत असताना याला त्यावर ‘फ्लिपकार्ड ई- कॉमस कमिशन टास्ट’ या नावाची लिंक व फोटो आला. त्यानंतर अज्ञाताने आपल्या व्हॉट्सअपवर संपर्क साधत एक रजिस्ट्रेशन लिंक पाठवली आणि तिच्यावर रजिस्ट्रेशन करण्यास सागितले. त्यानंतर विविध टास्कच्या माध्यमातून पैसे मिळतील असे सांगून शुभम शेट्ये यांच्याकडून वेळोवेळी टास्कच्या माध्यमातून ३ लाख ८९ हजार ९०० रूपयाची फसवणूक केली. त्यानुसार भारतीय न्यायसंहिता कायदा २०२३ चे कलम ३१८ (२), ३१८ (४), माहीती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (डी) प्रमाणे अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Online cheating of youth