गुहागर, ता. 15 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये गुहागर तालुका आरोग्य अधिकारी घनश्याम जांगीड यांचा शाळेच्या अमृत महोत्सवातील प्रकाशित करण्यात आलेली स्मरणिका व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. योगा प्रशिक्षिका आदिती धनावडे यांनी विद्यार्थ्यांकडून योगा प्रात्यक्षिक करून घेतले. Jangid felicitated by Navanagar School
पायाभूत चाचणीचे मूल्यांकन करण्याकरिता तालुका आरोग्य अधिकारी जांगीड यांनी शाळेला भेट दिली. मराठी विषयाची तोंडी परीक्षा चाचणीतील प्रश्नांची पडताळणी संख्याज्ञान व त्यावरील क्रिया, शाब्दिक उदाहरणे, इंग्रजी विषयाचे ज्ञान यावर आधारित विविध प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व प्रगतीबद्दल त्यांनी कौतूक केले. वेलदूर नवनगर शाळेमध्ये राबवीत असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. Jangid felicitated by Navanagar School
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. शालेय परिसरातील स्वच्छता याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी पौष्टिक अन्नाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दुकानातील कुरकुरे तस्सम पदार्थ आरोग्यासाठी अपायकारक आहेत. विद्यार्थ्यांनी नियमित योगसाधना करावी व पुरेसा व्यायाम व शारीरिक हालचाली कराव्यात. मनसोक्त खेळावे, चांगल्या आरोग्य विषयक सवयी जपल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यमान सुधारते, असे ते म्हणाले. यावेळी मुख्याध्यापक मनोज पाटील, आरोग्य सहाय्यक सचिन चौगुले, श्री. राठोड, डॉ. अशोक कुंभार, योग प्रशिक्षिका आदिती धनावडे, अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला आदी उपस्थित होते. Jangid felicitated by Navanagar School